सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं एखादा व्हिडीओ असो वा फोटो तो तात्काळ व्हायरल होतो. या प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या प्रत्येक पोस्टची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर याआधी दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.
दिल्ली मेट्रोतील कधी मारामारी, कधी रोमान्स तर कधी डान्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही तरूणांनी थेट दिल्ली मेट्रोमध्ये भजन गायलं आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दिल्ली मेट्रोच्या एका व्हिडिओने नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये काही तरूण भजन गाताना दिसत आहे. याआधीही श्रावनच्या निमित्ताने काही तरुणांनी मेट्रोमध्ये नृत्य करून वातावरणनिर्मिती केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे ट्विटरवर @AnchorAmandeep या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'हा देखील दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ आहे. जो पाहून तुम्हाला राग येणार नाही पण आनंद होईल. देवीचा जयजयकार.'
16 ऑक्टोबरला पोस्ट केलेला हा 38 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. या व्हिडीओला हजारोंपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ४ तरुणांचा ग्रुप देवीचे भजन गाताना दिसत आहेत. एक तरुण गिटार वाजवताना दिसत आहे. तर इतर सर्व तरूण 'तुने मुझे बुलाया शेरावालिए...' हे भजन गाताना दिसत आहेत. यादरम्यान मेट्रोमधील काही प्रवासी व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
तरुणांचे भजन ऐकून मेट्रोमधील इतर प्रवासी देखील या तरुणांसोबत भजन गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'दिल्ली मेट्रोचा हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. दुसर्याने लिहिले की, 'हा दिल्ली मेट्रोच्या आतील सर्वात आश्चर्यकारक व्हिडिओ आहे.' तिसर्याने लिहिले की,'आजचा सर्वोत्तम व्हिडिओ.' या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगली पसंती दिली असून त्यांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.