Sunny Leone: सनी लिओनीच्या प्रयत्नांना यश, बेपत्ता झालेली ९ वर्षांची अनुष्का सापडली; मुंबई पोलिसांचे मानले आभार

Sunny Leone Instagram Post: ९ वर्षांची अनुष्का सापडली असून तिला तिच्या आई-वडीलांकडे सोपवण्यात आलं आहे.
Sunny Leone Insta Post
Sunny Leone Insta Post Saam Tv
Published On

Sunny Leone Help To Missing Girl:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) सोशल मीडियावर (Social Media) नुकताच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सनी लिओनी चर्चेत आली होती. ९ वर्षांच्या बेपत्ता झालेल्या अनुष्का मोरेचा शोध घेण्यासाठी सनीने ही पोस्ट केली होती. सनीने ही पोस्ट करत आपल्या चाहत्यांना अनुष्काला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. अखेर सनीच्या प्रयत्नांना यश आले आहे. ९ वर्षांची अनुष्का सापडली असून तिला तिच्या आई-वडीलांकडे सोपवण्यात आलं आहे.

सनी लिओनीच्या घरामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेची ९ वर्षांची मुलगी अनुष्का मोरे ही बेपत्ता झाली होती. अनुष्काचे आई-वडील तिचा शोध घेत होते. पण ती काही सापडत नव्हती. शेवटी सनी लिओनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली होती. या पोस्टच्या माध्यमातून तिने अनुष्काला शोधून देणाऱ्याला ५० हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. सनी लिओनीची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली होती. सनीने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

आता सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर नवी पोस्ट करत अनुष्का सापडल्याची माहिती दिली आहे. सनीने इन्स्टाग्रामवर अनुष्काला तिच्या आई-वडिलांनी घट्ट मिठी मारल्याचा फोटो पोस्ट करत ती भेटील्याचे सांगितले आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आपल्या प्रार्थनांना अखेर यश मिळालं. ही सगळी देवाचीच कृपा. त्या चिमुकलीच्या संपूर्ण कुटुंबाकडून मुंबई पोलिसांचे मनापासून आभार. आमची अनुष्का २४ तासांनी पुन्हा आपल्या घरी परतली. माझ्या हितचिंतकांचे, चाहत्यांचे मनापासून आभार. तुम्ही ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केलीत. त्यामुळेच हे शक्य झाले आहे. तुमचे खूप खूप आभार.' असे म्हणत सनीने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, सनी लिओनीच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेची ९ वर्षांची मुलगी अनुष्का किरण मोरे जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बागमध्ये कुटुंबासोबत राहते. अनुष्का ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. सनी लिओनीने यासंदर्भात पोस्ट करत मदत करणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचसोबत तिने पोस्टमध्ये अनुष्काच्या आई-बाबांचा मोबाइल क्रमांक पोस्ट केला होता. त्याचसोबत तिने आपल्या चाहत्यांना अनुष्काला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.

Sunny Leone Insta Post
Tiger 3 Movie: सलमान खानचं टेन्शन वाढलं, सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या या देशात 'टायगर ३' वर बंदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com