International Yoga Day: फिटनेस फ्रिक मराठमोळी प्राजक्ता माळीचा नादच नाय, १०८ सुर्यनमस्कार घालत साजरा केला योग दिवस

Prajakta Mali Yoga Day Post: आज जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने प्राजक्ताने खास सोशल मीडियावर लाईव्ह करत तिने योगा दिवस साजरा केला.
Prajakta Mali Yoga Day Post
Prajakta Mali Yoga Day PostInstagram

Prajakta Mali Post: अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच दिलखेचक अदातील फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिची योगविद्या हे समीकरण तिच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. अनेकदा प्राजक्ता सोशल मीडियावर ती योगा करत असतानाचा व्हिडीओ शेअर करते, आज जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने प्राजक्ताने खास सोशल मीडियावर लाईव्ह करत तिने योगा दिवस साजरा केला.

Prajakta Mali Yoga Day Post
Sai Tamhankar Vacation Photo: सई ताम्हणकर स्पेनमध्ये नेमकी कोणाला करतेय डेट; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील प्राजक्ताने १०८ सुर्यनमस्कार घालत आजचा दिवस साजरा केला आहे. जगभरात आज योगा दिवस साजरा होत असताना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनीही आज योगा करत आजचा दिवस साजरा केला. प्राजक्ताने थेट लाईव्ह सूर्यनमस्कार करत आपल्या चाहत्यांनाही तिने सूर्यनमस्कार घालायला भाग पाडला. प्राजक्ताचे हे इंस्टाग्राम लाईव्ह सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या विशेष विक्रमासाठी अनेकांनी तिचे कौतुकही केलेय. (Marathi Actress)

प्राजक्ताने सोशल मीडियावर लाईव्ह शेअर करताना “सालाबादप्रमाणे या वर्षीही १०८ सूर्यनमस्कार घातले… त्याचा हा पुरावा... बाकी योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत...” असं भन्नाट कॅप्शन केलं आहे.

प्राजक्ताने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मी सकाळी सात वाजता १०८ सूर्यनमस्कार घालायला येणार आहे, तुम्हीही या असे ती म्हणाली होती. त्यानुसार प्राजक्ताने आपला संकल्प पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे यावेळी चाहत्यांनीही किती सूर्यनमस्कार घातले हे प्राजक्ताला कमेंट करत कळवले आहे. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com