सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘एबंडेंस इन मिलेट्स’ (Abundance in Millets) हे गाणं लिहिलं होतं. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर रिलीज सुद्धा झालेलं आहे. त्यांनी ह्या लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालं आहे. त्यांच्या ह्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फालू शाह आणि गौरव शाहने लिहिलेल्या या गाण्यामध्ये पंतप्रधानांच्या भाषणातील काही वाक्य आहेत. धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावे, यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. बाजरीची लागवड आणि धान्यांची उपयुक्ततेवर हे गाणं भाष्य करते. पंतप्रधानांच्या ह्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४ मध्ये, ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन प्राप्त झाले आहे. जगभरामध्ये मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीमत्वाला मिळत आहे.
आरोग्यासाठी धान्यांचे सेवन खूप महत्वाचे असते. धान्याचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हे गाणं स्पेशल बाजरीवर चित्रित केलं आहे. बाजरीचं सेवन केल्यामुळे शरीराला पौष्टिकता मिळते. अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. (Song)
मिळालेल्या माहितीनुसार, इतर ६ गाण्यांनाही ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. फालू शाह यांना अनेकवेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. २०२२ मध्ये तिच्या 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठीही 'बेस्ट चिल्ड्रन्स अल्बम' या पुरस्काराने गौरविण्यात आले. पती नवरा गौरव शाहने तिच्यासोबत अनेक गाण्यांमध्ये एकत्रित काम केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.