Late Night Sleeping Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

Health Tips: सध्याच्या तरुणामध्ये रात्री जास्त वेळ जागण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते.

Aarti Ingle

अपुऱ्या झोपेमुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तुम्ही रात्री किती वाजता झोपता या गोष्टीवर तुमचं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. झोपेची वेळ न पाळल्यास अनेक व्यक्तींमध्ये आजारांचा धोका असतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार रात्री 10 वाजता झोपणं हे आरोग्यासाठी योग्य असतं. रात्री १० ही झोपण्याची योग्य वेळ म्हणता येईल.

रात्री १ वाजल्यानंतर झोपणाऱ्या लोकांना चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारांना सामोर जावं लागतं. तुमची झोप ही मानसिक आणि भावनिक आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे झोप पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. रात्री झोप न झाल्यानं थकवा (fatigue)येणे, मूड खराब होणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. उशीरा झोपण्याचा तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम होतो.

खराब लाईफस्टाईलचं मुख्य कारण मोबाईल बनत चाललं आहे. निरोगी शरीरासाठी झोपेचे नियोजन करणं गरजेचं आहे. रात्री १ वाजल्यानंतर झोपण्याची सवय (habit)असेल तर तुम्ही स्वतःचं आजारांना आमंत्रण देत आहात. त्यामुळे तुम्हीही उशिरा झोपत असाल तर कोणत्या प्राणघातक आजारांना तुम्ही आमंत्रण देत आहात ते खाली वाचा.

उशिरा झोपणाऱ्यांनो सावध व्हा, होतील हे गंभीर आजार!

१) चिंता

उशिरा झोपणं चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आजारांचं लक्षण आहे. त्यामुळे अशा लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चिंता सतावते.

२) नैराश्य

झोपेच्या समस्यांमुळे नैराश्य (depression)आणि आत्महत्येच्या विचारांसह विविध मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा लोकांना लक्ष केंद्रित करण्यात अनेक अडचण निर्माण होतात.

3) वजन वाढणे

उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे तुमचं वजन वाढू शकतं. झोप हा विश्रांतीचा एक महत्त्वाचा कालावधी आहे. ज्या वेळेत तुमच्या शरीरात कॅलरीज बर्न होत असतात. त्यामुळे बरेचदा रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या लोकांचं वजन जास्त असत.

4) डोकेदुखी

पुरेशी झोप न मिळाल्यास डोकेदुखीची(headaches) समस्या उद्भवते. कमी झोपेमुळे डोकेदुखीची समस्या अनेकदा लोकांमध्ये दिसून येते. त्यामुळे मायग्रेनसारखा गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतो.

5) हृदयविकार

हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यातल एक महत्वाचं कारण म्हणजे उशीरा झोपणं. हृदयाच्या रक्त प्रवाहात तात्पुरती घट झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अपूऱ्या झोपेमुळे ही गंभीर समस्या निर्माण होते.

6) डोळ्यांखाली काळी वर्तुळे

अपूरी झोप तसंच उशीरा झोपल्यानं डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात त्यामुळे वेळेत झोपणं महत्वाचं आहे.

7) मूड स्विंग

पुरेशी झोप न झाल्यास थकवा जाणवतो ज्यामुळे मूड स्विंग होतात. परंतु स्पष्ट कारणाशिवाय मूड बदलणे हे असामान्य नाही. त्यामुळे पू्र्ण झोप तुमचा मूड सुधारू शकते.

मोबाईलसारख्या उपकरणांचा अतिवापर, व्यसनं, व्यायामाचा (workout)अभाव अशी कारणंसुद्धा झोप उडवण्यामागे असतात. त्यामुळे उत्तम मानसिक आरोग्यासाठी भरपूर आणि वेळेत झोप घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT