Sakshi Sunil Jadhav
सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. एप्रिल-मे महिन्यासारखी गरमी मार्चमध्येच जाणवायला लागलीये.
उन्हाच्या दिवसांमध्ये रोज किमान अर्धा कप नारळ पाणी प्यायलं पाहिजे असा सल्ला डॉक्टर देतात. पण बऱ्याचदा त्यातलं पाणी गोड नसल्यामुळे लोक तो विकत घेणं टाळतात. आता सोप्या ट्रिकने तुम्ही गोड पाण्याचा नारळ ओळखू शकता.
डार्क ग्रीन किंवा हलका पिवळसर रंग असलेला नारळ हा ताजा असतो. खूप तपकिरी किंवा डाग असलेला नारळ जुना झालेला असतो.
नारळ कानाजवळ हलवला असता पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला, तर त्यामध्ये पाणी भरपूर असण्याची शक्यता जास्त असते.
नारळावर असलेल्या तीन खुणांना डोळे म्हणतात. हे डोळे थोडे मऊ किंवा ओलसर वाटत असतील, तर नारळ ताजा असू शकतो.
नारळ उचलून पाहिल्यावर तो जड वाटत असेल, तर त्यात पाणी भरपूर असतं. खूप हलका वाटणारा नारळ आतून कोरडा असू शकतो.
किंचित शंकूच्या आकाराचा नारळ निवडणं जास्त योग्य मानले जातं. अशा नारळांमध्ये पाणी जास्त आणि मलई कमी असते.
नारळाच्या सालीवर जास्त तडे, डाग किंवा कुजल्यासारखं दिसत असेल तर तो नारळ विकत घेऊ नका.
विक्रेत्याकडून नारळाची माहिती आणि आश्वासन घ्या. नाहीतर नारळ कोरडा सुद्धा असू शकतो.
खूप काळ साठवून ठेवलेले नारळ आतून कोरडे किंवा पाण्याची चव फिकी असू शकते, त्यामुळे शक्यतो ताजे नारळ निवडा.