जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

iran and israel war impact : इराण-इस्रायल युद्धामुळे जगावर अणुहल्ल्याचं सावट पसरलयं.... अशातच अणु हल्ल्यापासून संरक्षणासाठी भारतानं एक रामबाण उपाय शोधलाय...भारतनं अणुहल्ल्यापासून वाचण्यासाठी कोणती कॅप्सूल बनलीय... आणि ती कॅप्सूल कशी काम करते? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
war impact on india
iran and israel war impact Saam tv
Published On

आखातातील युद्धानं टोक गाठलं असताना जगावर अण्वस्त्रा वापराच्या भितीचं सावट असतानाच, भारतानं पुन्हा संपूर्ण मानवजातीच्या रक्षणासाठी एक आशेचा किरण दाखवलाय, अण्वस्त्रांच्या रेडीएशनपासून बचावासाठी आता जागतिक इंधनपुरवठादार देश रांगा लावून उभेयेत. कारण भारताकडे आहे अभेद्य कवच असणारी मॅजिक कॅप्सूल.. ही कॅप्सूल या युद्धात मानवजातीसाठी कशी वरदान ठरणारेय, पाहा..

प्रुशियन ब्लू नावाची भारतीय कॅप्सूल

अण्वस्त्र हल्ल्यात इमर्जन्सी मेडिसिन

DRDO आणि INMAS लॅबचा शोध

किरणोत्सर्गी घटकांना शरीराबाहेर काढते

WHOकडून अत्यावश्यक औषध म्हणून मान्यता

पोटॅशियम आयोडाइड टॅब्लेट्सचीही चौकशी

पोटॅशियम आयोडाइड टॅब्लेट्स कॅन्सरचा धोका करते कमी

भारतात तयार होणारी प्रुशियन ब्लू कॅप्सूल ही अण्वस्त्र हल्ल्यात इमर्जन्सी मेडीसीन म्हणून अत्यंत महत्वाचीये. डीआरडीओ आणि आयएनएमएएस या लॅबनं ही औषध विकसित केलं असून या कॅप्सूलद्वारे अण्वस्त्र हल्ल्यात किरणोत्सर्गी घटक शरीराबाहेर काढतं. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश करत मान्यता दिलीये. तर पोटँशियम आयोडाईट टँब्लेट्सचीही चौकशी होऊ लागलीये. ही टॅबलेट अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या कॅन्सरचा धोका कमी करते आणि पोटॅशियम आयोडाइड ही ग्रंथी सुरक्षित ठेवते.

war impact on india
मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

चंदीगडमधील एका प्रख्यात औषध निर्मिती कंपनीला युद्धात पोळलेल्या बहरीनं संपर्क साधून तब्बल 1 कोटी अँटी-रेडिएशन कॅप्सूलची मागणी केलीये. या युद्धात अण्वस्त्रांची भिती असलेल्या अनेक देशांनीही या अण्वस्त्र हल्ल्यात रामबाण ठरलेल्या या कॅप्सूलची विचारणा भारताला केलीये. कारण भारताकडे या औषधांच्या निर्मितीसाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान, स्वस्त उत्पादन क्षमता आणि भारताच्या मानवतेसाठी धावून जाण्याच्या वृत्तीनं या देशांनीही भारताला पसंती दिली आहे.

war impact on india
सिलिंडरसाठी 2 तासांपासून रांगेत; उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

भारतानं कोरानाच्या संकटात 100 हून अधिक देशांना लस पुरवून वसुधैव कुटुंबकम् या भावनेतून जगाला मदत केली. युद्धात अनेक देश एकमेकांना संपवण्यासाठी विखारी शस्त्रांची मदत करत असतांना ही कॅप्सूल बनवून गौतम बुद्धांच्या जन्मभूमीनं जगाला पुन्हा शांतता आणि मानवतेचा मार्ग दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com