सिलिंडरसाठी 2 तासांपासून रांगेत; उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

punjab shocking News : पंजाबमध्ये उन्हात उभ्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ६६ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
punjab news
punjab shocking News Saam tv
Published On
Summary

पंजाबच्या बरनालामध्ये गॅस सिलिंडरसाठी लागल्या मोठ्या रांगा

रांगेत उभ्या असलेल्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

या घटनेमुळे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

पश्चिम आशियात अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध भडकलं आहे. या युद्धाचा थेट परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती सिलिंडर घेण्याासाठी लोक थेट रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे सूर्य तळपत असताना लोकांनी गॅस एजन्सीच्या समोर भल्या मोठ्या रांगा लावल्या आहेत. अशाच सिलिंडरच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पंजाबमधील बरनालामध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी दोन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका मृत्यू झाला. भुषण कुमार मित्तल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर काही लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यानंतर गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांनी एकच संताप व्यक्त केला.

punjab news
महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

अमृतसरच्या इस्लामाबाद येथे गॅस एजन्सीच्या बाहेर सिलिंडर वाटपावरून मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. गॅस सिलिंडर न मिळाल्याने एक वृद्ध महिला एजन्सीच्या बाहेर रडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लुथियानामध्ये सिलिंडरची चोरी

लुधियानाच्या शांतीनगरमध्ये सिलिंडर घेऊन घरी परतणाऱ्या व्यक्तीकडून दोन दुचाकीस्वारकांनी खुलेआम एकाकडून सिलिंडर हिसकावत फरार झाले. तर जालंधरमध्ये अनेक ग्राहकांना मोबाईलवर सिलिंडर पोहोचल्याचे मेसेज येत आहेत. परंतु प्रत्यक्षात घरात सिलिंडर पोहोचलेले नाहीत. गॅस एजन्सीला अनेक फोन आल्याने कंपनीचे सर्वर क्रॅश झालं. तर अनेकांना बुकिंग केल्यानंतर वन टाइम पासवर्ड देखील येत नाहीये.

punjab news
रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

पंजाबमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अफवांना घाबरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलं आहे. मुख्यमंत्री मान यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला सिलिंडर साठेबाजी आणि काळाबाजारावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. सिलिंडरचे वाटप केवळ ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com