Sakshi Sunil Jadhav
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण असल्यामुळे या दिवशी अनेक महिला पारंपरिक साडी परिधान करतात. मात्र साडी जितकी महत्त्वाची असते, तितकाच ब्लाउजचा डिझाइनही संपूर्ण लूक आकर्षक बनवतो.
बोट नेक पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. साध्या साडीलाही हा ब्लाउज एलिगंट आणि रॉयल लूक देतो.
शर्टसारखा कॉलर असलेला हा ब्लाउज पॅटर्न पारंपरिक साडीसोबत वेगळा आणि स्टायलिश दिसतो.
हाय नेक ब्लाउज साडीला क्लासी आणि सुसंस्कृत लूक देतो. पाडव्याच्या पारंपरिक सणासाठी हा उत्तम पर्याय आहे.
प्रिन्सेस कट पॅटर्न शरीराला फिट बसतो आणि साडीचा लूक जास्त आकर्षक बनवतो.
कोपरापर्यंत असलेली स्लीव्ह पारंपरिक साड्यांसोबत खूप सुंदर दिसते. विशेषतः पैठणी किंवा सिल्क साडीवर हा पॅटर्न उठून दिसतो.
पाठीमागे डीप कट असलेला ब्लाउज साडीला मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक देतो.
पारंपरिक लूकसाठी पफ स्लीव्ह ब्लाउज उत्तम पर्याय आहे. हा डिझाइन साडीला रेट्रो स्टाईल देतो.
पाठीमागे डोरी असलेला ब्लाउज साडीला पारंपरिक आणि आकर्षक लूक देतो.