अभिनेत्री नुसरत भरुचाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे. तिची आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. नुसरतनं लहानात लहान भूमिका अगदी लिलया साकारत आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवून दिली. अशा या गुणी अभिनेत्रीचा आज वाढदिवस. नुसरत भरूचाचा जन्म १७ मे १९८५ ला मुंबईत झाला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊ या...
अभिनेत्री नुसरत भरुचा हिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वत:चं विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीने 'प्यार का पंचनामा', 'छोरी', 'सेल्फी', 'सोनू के टीटू की स्वीटी' यांसारख्या चित्रपटांमध्ये विशेष काम केले आहे. मात्र, इंडस्ट्रीत काम करत असताना अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्या काळाबद्दल तिने आपल्या मुलाखतीत त्याचा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत नुसरत म्हणाली, "माझ्या 'लव्ह, सेक्स और धोका' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली होती. यानंतर 'प्यार का पंचनामा'ही प्रेक्षकांना खूप आवडला. मी खूप आनंदी होते. त्यानंतर माझा 'आकाशवाणी' चित्रपट आला, पण तो फ्लॉप ठरला. तो चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे मी खूप रडले होते. आणि जेव्हा केव्हा चित्रपट फ्लॉप ठरले, तेव्हा मी खूप रडली आहे. 'आकाशवाणी' चित्रपट रिलीज झाल्यानंतर एकदा मी निर्माते कुमार यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या ऑफिसमध्येच बसले होते. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की, चित्रपट फ्लॉप ठरलाय, सर्व चित्रपटाचे पैसे बुडाले आणि तोटा झाला. त्यावेळी मी काही वेळातच रडायला लागले. "अगं तु का रडतेय ?" असा प्रश्न मला निर्मात्यांनी विचारला."
मुलाखतीत नुसरत म्हणाली की, "निर्मात्यांनी मला समजावलं की, माझे पैसे पाण्यात गेले, पण मी हसतोय आणि तू का रडतेयस. फायदा-तोटा सुरुच असतो. तर मी निर्मात्यांना म्हणाले की, जितक्या पैशाचं आज नुकसान झालं आहे, ती रक्कम आजच्या तारखेत खूप मोठी आहे. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. आज मला फक्त इतकंच वाटतं की, कोणताही निर्माता जेव्हा माझ्या चित्रपटावर पैसा लावतो, त्यावेळी तो पैसा वसूल झाला पाहिजे, त्याचं नुकसान व्हायला नको. मला बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांचा कोणताही फरक पडत नाही."
"मी दीड वर्ष निराश होते. मला काय करावं कळत नव्हतं. त्यानंतर मला 'प्यार का पंचनामा २' मिळाला. शेवटी मला त्या चित्रपटासाठी कास्ट केलं गेलं. आम्ही शूटिंग करत होतो. मला चित्रपटाच्या कमाईबद्दल काहीही अपेक्षा नव्हत्या. पण त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या काळात मी अनेक गोष्टी शिकले, काम करत राहिले. मी हार मानली असती तर आज इथे नसते. तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा लागेल. मला विश्वास होता की मी हे करू शकते. इथपर्यंतचा पल्ला गाठण्यासाठी मी विशेष मेहनत घेतली."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.