OTT Released This Week : ‘द नक्सल स्टोरी’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, OTT वर मनोरंजनचा धमाका; पाहा लिस्ट

New OTT Releases Movies And Web Series (13th May To 19th May): ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. यंदाचा वीकेंड सिनेप्रेमींसाठी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
New OTT Releases Movies And Web Series
New OTT Releases Movies And Web SeriesSaam Tv

ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका असतो. ओटीटीवर चित्रपट, वेबसीरीज आणि वेब फिल्म पाहण्याची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना ॲक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा तडका पाहायला मिळणार आहे. मे महिनातल्या या वीकेंडला सस्पेन्स आणि रोमान्स असलेले अनेक नवीन चित्रपट आणि वेबसीरीज रीलीज झाल्या आहेत. त्यामुळं हा वीकेंड सिनेमाप्रेमींसाठी भरपूर मनोरंजनाचा असणार आहे.

New OTT Releases Movies And Web Series
Emergency Movie Released Date: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
Zara Hatke Zara Bachke
Zara Hatke Zara BachkeInstagram

जरा हटके जरा बटके (Zara Hatake Zara Bachake)- Jio Cinema

गेल्या वर्षी रिलीज झालेला 'जरा हटके जरा बटके' (Zara Hatake Zara Bachake) चित्रपट येत्या १७ मे ला 'जिओ सिनेमा' (Jio Cinema) वर रिलीज होणार आहे. विकी कौशल आणि सारा अली खान चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे.

बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड- (Baahubali Crown Of Blood)- Hotstar

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आता ॲनिमेशन अंदाजात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १७ मे ला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

Bastar The Naxal Story
Bastar The Naxal StorySaam Tv

द नक्सल स्टोरी- (The Naxal Story)- Zee 5

अदा शर्मा स्टारर 'द नक्सल स्टोरी' (The Naxal Story) चित्रपट येत्या १७ मे ला 'झी ५' (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी खास कमाई केली नाही.

New OTT Releases Movies And Web Series
Manoj Jarange Patil News | गावबंदी असताना मंत्री गावात आले! मराठा आंदोलनकर्त्यांनी पुढे काय केलं?

केलवन- (Kelvan)- Disney Plus Hotstar

टॉलिवूड चित्रपट 'केलवन' गेल्या ४ मे ला 'डिज्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटीवर रिलीज झालेला आहे.

मडगांव एक्सप्रेस- (Madgaon Express)- Amazon Prime Video

कुणाल खेमू, अविनाश तिवारी, दिव्येंदू शर्मा आणि अभिनेत्री नोरा फतेहीचा 'मडगांव एक्सप्रेस' ((Madgaon Express) चित्रपट येत्या १७ मे ला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर (Amazon Prime Video) पाहता येणार आहे.

New OTT Releases Movies And Web Series
Hema Malini And Dharmendra News : 'धर्मेंद्रपासून वेगळं राहून मी खूश...'; विभक्त राहण्यावर हेमा मालिनी यांचा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com