कंगना रणौतचा 'इमरजन्सी' चित्रपट काही केल्या प्रदर्शित होण्याचं नाव घेत नाहीये. चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीच्या चित्रपटाची रिलीज डेट ढकलल्याची तारीख समोर आली होती. अशातच आता पुन्हा एकदा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या कंगनाचे चाहते नाराज झाल्याचे वृत्त आहे.
कंगनाच्या 'इमरजन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, "क्वीन कंगना रणौत हिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिचं देशाप्रती असलेलं तिचं कर्तव्य आणि देशसेवेची तिची बांधिलकी या गोष्टीला सध्या ती प्राधान्य देत आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला लवकरच नवीन रिलीज डेट सांगू. तुम्ही दिलेल्या प्रतिसादा प्रती तुम्हा सर्वांचे मी आभार मानते."
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा बदलली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या टीमने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. १४ जून २०२४ ला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट पूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये रिलीज होणार होता. पण निर्मात्यांनी त्यानंतर दोनवेळा रिलीज डेट बदलली होती.
'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये कंगना रनौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिने या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका साकारली नाही तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यात विरोधी पक्षनेते जेपी नारायणच्या भूमिकेत अनुपम खेर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण दिसणार आहेत. 'इमर्जन्सी'मध्ये महिमा चौधरी आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.