Kiran Rao On Laapata Leadies Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Rao On Laapata Ladies Film : ‘लापता लेडीज’ बॉक्स ऑफिसवर का आपटला? चित्रपट कोणामुळे झाला प्लॉप, किरण रावने  सांगितलं कारण

Kiran Rao On Laapata Ladies News : चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करूनही दिग्दर्शक किरण रावने चित्रपटाविषयी महत्वाचे विधान केले आहे. चित्रपट फ्लॉप होण्याचं खापर किरण रावने स्वत:वर फोडलं आहे.

Chetan Bodke

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ १ मार्चला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. ४ ते ५ कोटींमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटींची कमाई केलेली आहे. ह्या चित्रपटाने ओटीटीवरही अफलातून कामगिरी केली होती. १००० कोटींच्या क्लबमध्ये कमाई केलेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाला मागे टाकत सर्वाधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. या चित्रपटाने इतकी दमदार कमाई करूनही दिग्दर्शक किरण रावने चित्रपटाविषयी महत्वाचे विधान केले आहे. चित्रपट फ्लॉप होण्याचं खापर किरण रावने स्वत:वर फोडलं आहे.

नुकतंच किरण रावने पत्रकार फे डिसुझाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने हा चित्रपट फ्लॉप होण्याचं सर्व खापर स्वत:वरच फोडलं आहे. मुलाखतीमध्ये किरण राव म्हणाली, " माझा २०१० मध्ये 'धोबी घाट' चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने इतकी खास कमाई केली नव्हती. पण 'लापता लेडीज' चित्रपटाने 'धोबी घाट' चित्रपटाने परफॉर्मन्स दिलेला नाही. त्यामुळे मला तरी हा एक अपयशी चित्रपट वाटतो. आम्ही १०० कोटींचा बिझनेस केला नाही. फक्त जेमतेम ३० ते ४० कोटींचीच कमाई केलेली आहे. हा चित्रपट न चालण्याचा मी स्वतःला जबाबदार मानते."

"शिवाय, 'धोबी घाट' फ्लॉप ठरल्याचे ही खापर मी स्वत:वरच फोडेल. खरंतर त्यावेळी थिएटरशिवाय दुसरा कोणताही ऑडियन्स नव्हता. प्रेक्षकवर्गही जास्त नव्हता. मी गेल्या १० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. मी खूप चांगले चित्रपट करेल असंही मला वाटायचं, पण तसं काही झालं नाही. मी रोज काम करायचे. त्यामुळे हे माझे रोजचे अपयश आहे असे मला वाटते. मला असे वाटतं की, जेव्हा क्रिएटिव्ह लोकं कमी वेळेत काहीतरी साध्य करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना अपयश आल्यासारखे वाटू लागते." अशी प्रतिक्रिया किरण रावने दिलेली आहे.

किरण रावचा 'लापता लेडीज' हा दुसरा चित्रपट आहे. तिचा पहिला चित्रपट २०१० मध्ये रिलीज झालेला 'धोबी घाट' हा चित्रपट होता. 'लापता लेडीज'मध्ये मुख्य भूमिकेत प्रतिभा रंटा, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन हे कलाकार होते. किरण रावच्या 'मिसिंग लेडीज'ने नेटफ्लिक्सवर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटाला मागे टाकले आहे. या चित्रपटाने ओटीटीवर १३.८ मिलियन्सच्या व्ह्यूजचा टप्पा गाठला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT