Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन

Amitabh Bachchan Fitness Secrete : बिग बी अमिताभ बच्चन यांचं ह्या वयात सुरु असलेलं काम पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. अमिताभ बच्चन आपल्या फिटनेससाठी काय डाएट प्लॅन आखतात? त्यांचे रुटीन कसे आहे यांची सर्वांनाच उत्सुकता असते.
Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Amitabh Bachchan FitnessSaam Tv
Published On

पराग खरात - साम टिव्ही

बॉलिवूडचे सगळेच स्टार आपल्या फिटनेसबाबत कमालीचे जागरूक झालेत. मात्र काही असेही ज्येष्ठ अभिनेते आहेत ज्यांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यात अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांचं नाव जास्त चर्चेत आहे. त्यातही बिग बी यांचं ह्या वयातही सुरु असेलेलं काम पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करतात.

Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Most Watch OTT Released Films : ओटीटीवर कोणत्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ? 'या' आहेत मोस्ट वॉच्ड फिल्म; सारा अली खानच्या दोन चित्रपटांचा समावेश

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आपला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी ८२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. मात्र या वयातही त्यांची एनर्जी, सळसळता उत्साह सगळ्यांनाच भावतो. अमिताभ बच्चन आपल्या फिटनेससाठी काय डाएट प्लॅन आखतात? त्यांचे रुटीन कसे आहे यांची सर्वांनाच उत्सुकता असते. चला तर मग आपण जाणून घेऊया अमिताभ यांच्या तंदुरुस्तीचं रहस्य काय आहे.

अमिताभ तास न तास काम करूनही सतत ताजेतवाने कसे असू शकतात याबाबत नेहमीच चर्चा होत असते. फार कमी लोक आहेत या वयातही एवढे ॲक्टिव्ह असतात. खरतच इतक्या वर्षांच्या आयुष्यात तेही अनेक आजारांना सामोरे गेलेत. 'कुली' सिनेमाच्या शुटींग दरम्यान जीवघेणी दुर्घटना घडली होती. अवघड सर्जरी झाली. या सगळ्यातून जात बीग बी आजही फिट आहेत. त्यामागे त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली आहे. म्हणतात ना 'लवकर निजे लवकर उठे, त्याला सुख-संपत्ती प्राप्त होते' बीग बीही तेच करतात.

Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Sonia Bansal Hospitalized : ‘बिग बॉस १७’ फेम सोनिया बन्सल रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीला नेमकं काय झालंय ?

असा आहे अमिताभ यांचा व्यायाम

खरंतर अमिताभ बच्चन खूपच साधं आयुष्य जगतात. साधं अन्न खातात. ते सकाळी लवकर उठून २० मिनिटं चालण्यासाठी जातात आणि हलके फुलके एक्सरसाईज करतात. रक्ताभिसरण उत्तम रहावे यासाठी व्यायाम कधी चुकवत नाहीत. यामेळेच दिवसभर त्यांची उर्जा उत्तम रहाते.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, की ते नऊ तास झोप घेतात. त्यांना रात्री लवकर झोपायची सवय आहे. त्यांमुळेच त्यांचं आरोग्य चांगले राहते. एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की, नियमित प्राणायम आणि काही श्वासाचे व्यायाम न चुकता ते करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्कोहोल, चहा, कॉफी या गोष्टींपासून ते दूर राहतात.

Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Bad Newz Vs Sarfira : विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा, अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ची कमाई काय?

असा आहे अमिताभ यांचा नाष्टा

सकाळी नाश्त्यामध्ये ते अंड आणि एक ग्लास दूध घेतात. या दोन्ही गोष्टीमुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. नाश्त्यामध्ये अंडा आणि दूध घेतल्यानंतर दुपारच्या जेवणाआधी नारळाचं पाणी, आवळ्याचा ज्यूस, केळी, तुळसची पाने, बदाम खातात. जर विचार केला तर हे सर्व पदार्थ शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत. त्यांना साधं जेवण आवडतं आणि हेच यामागचं रहस्य आहे. त्यांच्या जेवणात डाळ, भाजी आणि चपाती असते.

Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Suriya Birthday : वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही मुलाने केली होती फॅक्टरीत नोकरी, वाचा सूर्या 'सिंघम'चा थक्क करणारा प्रवास...

2000 साली पर्यंत ते मांसाहारी पदार्थ खात होते. पण आता ते पूर्ण शाकाहारी झालेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या एका एपीसोडमध्ये त्यांनी सांगितलं होतं, की त्यांना चाट खाणंही आवडतं. तसंच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत की दिल्लीत बंगाली स्वीट हाऊस मध्ये वेग-वेगळे चाट खाण्याचा आनंद त्यांनी घेतला होता.

रात्रीच्या जेवणात बीग बी हलकेच जेवतात. जेवणात सूप असते. तसंच कधी कधी पनीर-भूर्जी पण खातात. जर तुम्हांलाही स्वस्थ आणि दिर्घायुषी आयुष्य जगायचं असेल तर अमिताभ बच्चन यांच्यासारखी सवय अंगिकारायला काही हरकत नाही.

Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन
Himesh Reshammiya Birthday : वडिलांच्या अपुऱ्या इच्छेमुळे हिमेश रेशमियाने बदलला निर्णय, व्हायचं होतं अभिनेता पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com