प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता सूर्या (Suriya) नेहमीच आपल्या अभिनयामुळे कमालीचा चर्चेत असतो. त्याला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आज अभिनेता सूर्याचा (23 जुलै) ४९ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या सूर्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी नोकरी केली होती. मात्र, अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं होतं.
अभिनेता सुर्या ह्याचा जन्म २३ जुलै १९७५ ला तामिळनाडूतील चेन्नईमध्ये झाला आहे. सुर्याचं खरं नाव सरवनन शिवकुमार असं असून तो टॉलिवूड अभिनेते शिवकुमार ह्यांचा मुलगा आहे.
चित्रपटामध्ये काम करण्यापूर्वी सुर्या एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये स्वत:ची ओळख लपवून काम करायचा. तो त्यावेळी त्या फॅक्टरीमध्ये १००० रुपये कमवायचा. मात्र, या नोकरीत त्याचे मन फारसे रमले नाही.
म्हणून सुर्याने ८ महिन्यातच नोकरी सोडून दिली. सुर्याला वडिलांच्या नावाचा वापर न करता, स्वत:च्या हिंमतीवर ओळख बनवायची होती. म्हणून, त्याने केव्हाच स्वत:ची ओळख सांगितली नाही.
एका मुलाखतीत सुर्याने सांगितले होते की, "मला करियरच्या सुरूवातीला आत्मविश्वास, स्मरणशक्ती, ॲक्शन आणि डान्सिंग स्किल्सची कमतरता असल्यामुळे मला अनेकदा नकार मिळाला होता. त्या गोष्टींचा मला खूप सामना करावा लागला होता. त्यावेळी मला रघुवरन अनेक गोष्टी शिकवायचा समजवायचा. त्यामुळेच मी माझ्या वडिलांच्या ओळखीचा वापर न करता स्वत:ची ओळख प्रस्थापित करत इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केलं."
१९९७ मध्ये रिलीज झालेल्या, 'नेररुक्कू नेर' चित्रपटातून सुर्याने वयाच्या २२ व्या वर्षी टॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. खरंतर त्याने १९९५ मध्ये डेब्यू केले असते. पण त्याने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली.
सुर्याला एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून खरी ओळख, 'नंदा' चित्रपटातून मिळाली. २००१ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट त्याच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. सुर्याने ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वयाच्या २७ व्या वर्षीच सुर्याने फिल्मी करियरमध्ये खूप प्रसिद्धी आणि संपत्ती कमावली. तो टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.