Pallavi Joshi Birthday: पल्लवी जोशीच्या अभिनयाची दिग्दर्शकाने उडवलेली खिल्ली, राष्ट्रीय पुरस्कार जिंकत दिलेलं उत्तर

Pallavi Joshi Struggle Story: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयातून सर्वांनाच थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. पल्लवीचा आज (४ एप्रिल) वाढदिवस आहे.
Happy Birthday Pallavi Joshi
Happy Birthday Pallavi JoshiInstagram
Published On

Happy Birthday Pallavi Joshi

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयातून सर्वांनाच थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. पल्लवीचा आज (४ एप्रिल) वाढदिवस आहे. पल्लवी एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्माती देखील आहे.

पल्लवीचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी मुंबईत झाला. आज पल्लवी तिचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात ‘राधिका मेनन’ हे पात्र साकारले होते. खूप काळानंतर सिनेसृष्टीमध्ये पुन्हा दमदार कमबॅक केलेल्या पल्लवीच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या नकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. (Bollywood)

Happy Birthday Pallavi Joshi
Chef Kunal Kapur Divorce: बायकोच्या त्रासाला कंटाळून हायकोर्टात पोहोचला; सेलिब्रिटी शेफने लग्नाच्या १६ वर्षांनी घेतला घटस्फोट

पल्लवीने ‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या स्ट्रगलच्या काळाबद्दल सांगितले आहे. आपल्या स्ट्रगलबद्दल पल्लवी जोशी म्हणाली, “माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये, एका दिग्दर्शकाने सेटवर माझा वाईट पद्धतीने अपमान केला होता. दिग्दर्शक नेहमीच माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक करायचे. दिग्दर्शकांना माझा मेकअप, हेयरस्टाईल, फॅशन आणि माझा अभिनयही आवडत नसायचा. सेटवर दिग्दर्शक नेहमीच माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागायचे, मला अपमानास्पद वागणूक द्यायचे.”

पल्लवी पुढे मुलाखतीमध्ये म्हणाली की, “दिग्दर्शकांना वाटायचं की, मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते. नेहमीच दिग्दर्शकांना वाटायचं की, मी कधीही बेस्ट ॲक्ट्रेस होऊ शकत नाही. मला आधी माझी थट्टा वाटायची. पण नंतर मला समजले की, ते माझा अपमान करत आहेत. मी त्यांचे हे वाक्य ऐकून सेटवरच रडायला लागली होती. तेव्हा मला वाटायचे की, अभिनय आपलं काम नाही. दिग्दर्शकांच्या या वाक्यानंतर मी काही दिवस सिनेसृष्टीपासून दुर होते. मी १९९४ मध्ये रिलीज झालेला ‘वो छोकरी’ चित्रपटातून पुन्हा कमबॅक केलं. या चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मी सुद्धा उत्तम अभिनय करू शकते, याची जाणीव झाली.”

Happy Birthday Pallavi Joshi
Ranbir Kapoorच्या 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, सेटवरून समोर आला पहिला फोटो

पल्लवीने केवळ हिंदीच नव्हे तर, गुजराती आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘आदमी सडक का’, ‘डाकू और महात्मा’, ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटांमध्ये पल्लवी बाल कलाकार म्हणून झळकली होती. तर, ‘अल्पविराम’, ‘मिस्टर योगी’, ‘भारत एक खोज’, ‘जूस्तजू’, ‘मृगनयनी’, ‘तलाश’, ‘इम्तिहान’, ‘ग्रहण’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम पाहिले आहे.

१९९७मध्ये पल्लवीने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. पल्लवी आणि विवेक यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना जवळपास तीन वर्षे डेट केले. त्यांनतर २८ जून १९९७ रोजी लग्नबंधनात अडकले. (Entertainment News)

Happy Birthday Pallavi Joshi
Isha Ambani ने अमेरिकेच्या गायिकेला विकला ५०० कोटींचा आलिशान बंगला; १२ बेडरूम-जिम-सलूनसह आहेत या सुविधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com