Chef Kunal Kapur Divorce: बायकोच्या त्रासाला कंटाळून हायकोर्टात पोहोचला; सेलिब्रिटी शेफने लग्नाच्या १६ वर्षांनी घेतला घटस्फोट

Chef Kunal Kapur divorce : कुणाल कपूरच्या बायकोचं वागणं त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करणारं नव्हतं. तसेच त्याची काळजी घेणारं नव्हतं. कौटुंबिक कोर्टाने कुणालच्या घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.
Chef Kunal Kapur divorce
Chef Kunal Kapur divorce Saam tv

Chef Kunal Kapur Life Update :

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. दिल्ली हायकोर्टात बायकोच्या क्रूर वागण्याच्या आधारावर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरने घटस्फोट घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुणाल कपूरच्या बायकोचं वागणं त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करणारं नव्हतं. तसेच त्याची काळजी घेणारं नव्हतं. कौटुंबिक कोर्टाने कुणालच्या घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

लग्नाच्या १६ वर्षानंतर कुणाल बायकोपासून विभक्त

कुणाल कपूने २००८ साली एकता कपूरशी लग्न केलं होतं. लग्नाच्या ४ वर्षानंतर दोघे आई-बाबा झाले. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागले. बायकोच्या त्रासाला कंटाळून त्याने कोर्टाची वाट धरली. सेलिब्रिटी शेफने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं की, बायको एकता आई-वडिलांचा आदर करत नाही. ती नेहमी आई-वडिलांचा अपमान करते. तिने नेहमी माझा आणि माझ्या आई-वडिलांचा छळ केला आहे'.

Chef Kunal Kapur divorce
#boycottbollywood : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा इतिहास थोडक्यात जाणून घ्या ! | Entertainment | Movies

बायकोनेही कोर्टात मांडली भूमिका

दुसरीकडे एकताचं म्हणणं आहे की, 'तिने नेहमी पत्नीची भूमिका निभावली आहे. नेहमी पती आणि सासू-सासऱ्यांचा आदर केला आहे. मला अंधारात ठेवून घटस्फोटासाठी खोटे आरोप केले जात आहेत'.

कोर्टाने दिला शेफच्या बाजून निर्णय

कोर्टाने घटस्फोटाच्या प्रकरणात निर्णय देताना म्हटलं की, 'शेफच्या विरोधातील आरोप कोर्टात सिद्ध होऊ शकलेले नाही. खोट्या आरोपांच्या नावाखाली त्याची पल्बिक इमेज खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे. खरंतर ही क्रुरता आहे'. यानंतर कोर्टाने शेफच्या बाजूने निर्णय दिला. कोर्टाच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर सेलिब्रिटी कुणाल आणि एकता लग्नाच्या १६ वर्षांनंतर विभक्त झाले.

Chef Kunal Kapur divorce
Priyanka Chopra Don 3 Entered: ‘जंगली बिल्ली’ पुन्हा ‘डॉन’चा पाठलाग करणार; रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लची एन्ट्री?

कुणालला लहानपणापासून जेवण बनविण्याची आवड

दरम्यान, शेफ कुणाल हा ४४ वर्षांचा आहे. कुणाल राहायला दिल्लीत आहे. त्याला लहानपणापासून जेवण बनवण्याची आवड होती. त्याने 'मास्टरशेप इंडिया' या शोमध्ये जजची भूमिका निभावली. इन्स्टाग्रामवर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तो इन्स्टाग्रामवर जेवण तयार करण्याचे व्हिडिओ शेअर करत असतो. शेफ कुणालचे इन्स्टाग्रामवर ३ कोटीहून फॉलोवर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com