Kiran Rao on Reena Dutt: मी लग्न करून आले तेव्हा..., आमिर खान- रीना दत्ताच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली किरण राव

Aamir Khan And Reena Dutta Divorce: नुकताच 'लापता लेडीज' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान किरण रावने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने सांगितले की, 'मी आमिर खानसोबत लग्न केले होते तरी देखील रीना कुटुंबाला सोडून गेली नव्हती.'
Kiran Rao On Aamir Khan And Reena Dutta Divorce
Kiran Rao On Aamir Khan And Reena Dutta Divorce Saam Tv
Published On

Kiran Rao On Aamir Khan And Reena Dutta Divorce:

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टार परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लापता लेडीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. किरण राव आणि आमिर खान यांचा घटस्फोट झाला असे असताना देखील दोघांचे बॉन्डिंग चांगले आहे. किरण राव आणि आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता यांच्यामध्ये देखील काहीच मतभेद नाही. दोघींमध्ये देखील चांगले बॉन्डिंग आहे. अशामध्ये नुकताच 'लापता लेडीज' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान किरण रावने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने सांगितले की, 'मी आमिर खानसोबत लग्न केले होते तरी देखील रीना कुटुंबाला सोडून गेली नव्हती.'

आमिर खान आणि किरण राव वेगवेगळे झाले असले तरी देखील ते एकमेकांसोबत काम करतात. ही गोष्ट अनेकांना चकीत देखील करते. झूमसोबत गप्पा मारताना किरण रावने आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. 'मी खूप लकी आहे की मी संपूर्ण कुटुंबासोबत लग्न केले होते. ज्या कुटुंबावर मी प्रेम करते आणि प्रेम करणे अजूनही सुरूच आहे.', असे किरण रावने सांगितले.

किरण राव सासूवर खूपच प्रेम करते. तिने आमिर खानच्या कुटुंबाचे कौतुक देखील केले आहे. आमिर खानसोबत 2002 मध्ये घटस्फोट होऊन देखील रीनाने कधीच कुटुंबाला सोडले नाही. आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला पण सर्वकाही तसंच राहिले. आमचे कुटुंब रीनाच्या बाबतीत खूपच प्रोटेक्टिव होते. रीना आमच्या कुटुंबाचा हिस्सा होती आणि जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली कारण ती चांगली व्यक्ती आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करते.'

आमिर खानने त्याची पहिली पत्नी रीना दत्ताला 2002 मध्ये घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर काही लोकांनी असे म्हटले होते की, आमिरने किरण रावमुळे रीना दत्ताला घटस्फोट दिला. या मुलाखतीदरम्यान किरणने सांगितले की, 'लोकांना वाटते की माझ्यामुळे आमिरने घटस्फोट घेतला. पण हे चुकीचे आहे. 'लगान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि मी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली नव्हती. लोकांना वाटते की मी 'लगान'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होतो आणि याच काळात आम्ही जवळ आलो.'

किरणने पुढे सांगितले की, 'कदाचित कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. पण 'लगान'च्या शूटिंगदरम्यान आम्ही दोन-तीन वेळा बोललो असावे. 2004 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांसोबत बाहेर जायला लागलो. त्या दिवसांत आमिर 'मंगल पांडे' चित्रपटाचे शूटिंग करत होता. दरम्यान, किरण राव आणि आमिर खान यांनी 2005 मध्ये लग्न केले होते. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. किरण आणि आमिर 2021 मध्ये परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे झाले. किरण सांगते की, 'माझ्यासाठी माझी सर्वात मोठी प्राथमिकता माझा मुलगा आहे. त्याला कोणत्याही कारणाने दुखापत होऊ नये असे मला वाटते.'

Kiran Rao On Aamir Khan And Reena Dutta Divorce
'बडे मियाँ छोटे मियाँ' मधलं 'वल्लाह हबीबी' गाणं आऊट, Akshay Kumar आणि Manushi Chhillar ची जबरदस्त केमिस्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com