

रोहित कदम, साम टीव्ही
लग्न ठरलंय, पत्रिका वाटल्यात मात्र आता तुमचं लग्न लांबणीवर पडू शकतं... होय तुम्ही बरोबर ऐकताय... मध्य-पूर्वेतील युद्धामुळं देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय. अशातच आता लग्नसराईचाही हंगाम सुरू झालाय. मात्र गॅसच्या टंचाईमुळे राज्यातील केटरिंग व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. केटरिंग व्यावसायिकांनीही घेतलेल्या लग्नातल्या जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे लग्न ठरलेल्या कुटुंबांपुढे पाहुणेमंडळींना काय जेवू घालायचं असा प्रश्न निर्माण झालाय ...याचा सर्वात मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसलाय.
पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवसांत 10 हजार लग्न सोहळे
सुमारे 450 पेक्षा जास्त नोंदणीकृत केटरर्स लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स घेतात
मात्र लग्न सराईच्या तोंडावर गॅस टंचाईमुळे केटरर्सनं घेतलेल्या ऑर्डर रद्द केल्या आहेत.
अशातच काही केटरर्स 10 ते 20 टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.
तसंच पिंपरी-चिंचवडमधल्या 450 केटरर्सकडे काम करणाऱ्या 45 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
लग्नासाठी हॉल, डेकोरेशन, वाजंत्री यांसारख्या गोष्टी आगाऊ बुकिंग केलेल्या असतात. मात्र, केटरिंग व्यवसाय कोलमडल्यामुळे संपूर्ण लग्न सोहळ्याचं नियोजन बिघडलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत इराण युद्धाबाबत तोडगा निघाला नाही, तर हजारो लग्नांमध्ये गॅस टंचाईचं विघ्न येणार एवढं नक्की...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.