दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

Amravati crime news : दारू पिऊन सारखा त्रास देणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या वलगावमध्ये ही घटना घडली.
Amravati news
Amravati crime news Saam tv
Published On
Summary

अमरावतीच्या खारतळेगावात घडली धक्कादायक घटना

बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू

नवरा वारंवार दारू पिऊन बायकोला त्रास देत असल्याची माहिती समोर

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावतीमधून एक खळबजनक घटना समोर आली आहे. अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशच्या हद्दीतील खारतळेगावात बायकोने नवऱ्याची हत्या केली. पत्नीने केलेल्या जबर मारहाणीत पतीचा मृ्त्यू झालाय. ४५ वर्षीय पतीच्या मृत्यूने गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

मंगेश देविदास गोटे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश हा कुटुंबासोबत खारतळेगावात राहत होता. मंगेश गोटे हा घरात सारखा दारू पिऊन यायचा. नवरा मंगेशच्या सततच्या दारू पिण्याला बायको वैतागली होती. नवरा दारू पिऊन त्रास द्यायचा, अशी बायकोची तक्रार होती.

Amravati news
ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

त्या दिवशी काय घडलं?

मंगेश दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत असलेल्या मंगेशने बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर भडकलेल्या बायकोने नवऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर शेजारीपाजारी लोकांमध्ये खळबळ दिली. त्यावेळी बायकोने नवऱ्याला माराहाण केल्याचे कबूल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Amravati news
Wednesday Horoscope : आर्थिक व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मंगेशच्या बायकोला ताब्यात घेतलं. तसेच घरात असलेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मंगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनात मारहाणीमुळे मंगेशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी वलगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केली आहे.

Amravati news
चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अमरावतीचे पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितलं की, 'मंगेश गोटे याची त्याच्या पत्नीने हत्या केली. नेहमी दारू पितो आणि त्रास देत मारहाण करतो, या कारणावरून लाथबुक्यांनी मारहाण करत हत्या केली. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास देखील सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com