ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

Thane accident news : ठाण्यात भीषण अपघात, टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटल्यानंतर कार थेट ४० खड्ड्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे.
Thane news
Thane accident news : Saam tv
Published On

ठाण्यात टेस्ट ड्राइव्हदरम्यान कार ४० फूट खड्ड्यात कोसळली

महिला चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

अपघातात जखमी झालेल्या तिघांना केलं रुग्णालयात दाखल

ठाण्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. ठाण्यातील पाचपाखाडीमध्ये चारचाकी वाहनाचा टेस्ट ड्राइव्ह सुरू असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ही कार थेट चाळीस फूट निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात कोसळली. या कारमध्ये तिघे जण होते. एका रिक्षाला धडक देत कार खड्ड्यात कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

ठाण्यात टेस्ट ड्राइव्हदरम्यान महिला चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर गाडी थेट बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातावेळी गाडीत एक महिला तिचा नातेवाईक आणि एक कंपनीचा कर्मचारी होता. नौपाडा परिसरातील उत्सव हॉटेलच्या मागच्या बाजूला हा अपघात झाला.

Thane news
Mumbai Shocking : रात्री झोपेतून लघवीसाठी घराबाहेर गेला; तरुण जाळी तुटलेल्या विहिरीत पडला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

ठाण्यातील हा अपघात इतका भीषण होता की, गाडीने रस्त्यावरील चहाची टपरी, रिक्षा आणि दुचाकी वाहन धडक देऊन थेट बांधकाम सुरू असलेल्या शेडमध्ये घुसली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी कौसल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या नौपाडा पोलिस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून गाडी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Thane news
महाराष्ट्रासह देशात गॅसचा तुटवडा; मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, तुमच्यावर काय परिणाम होणार?

मुंबईत भीषण अपघात

मुंबईच्या दहिसर रावलपाडा परिसरात मोठा अपघात झाला. दहिसर पूर्वेतील रावलपाडा परिसरात रेती कंपाउंड परिसरात भरधाव ट्रकने तिघांना चिराडल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com