Mumbai Shocking : रात्री झोपेतून लघवीसाठी घराबाहेर गेला; तरुण जाळी तुटलेल्या विहिरीत पडला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Borivali News : रात्री झोपेतून लघवीसाठी घराबाहेर गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घटना घडली आहे. या घटनेत तरुणाच्या मृत्यू झाल्याने बोरिवलीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या बोरिवलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील बाभई नाका परिसरात विहिरीत पडून २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री झोपेतून लघवीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला विहिरीवरील जाळी तुटलेली असल्याचे लक्षात न आल्याने तो थेट विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला विहिरीतून बाहेर काढले. मात्र त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात पाणी गेले होते. त्याला तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com