

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन डागण्यात आलेत
या हल्ल्यात चार नागरिक किरकोळ जखमी
घटनेनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बुधवारी दोन ड्रोन डागल्यानंतर एकच खळबळ उडाली. ड्रोन डागल्याने दुर्घटनेत ४ जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जखमीमध्ये दोन घानाचे नागरिक, एका बांगलादेशी आणि एका भारतीयाचा समावेश आहे. ड्रोन डागल्यानंतर दुबईतील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
विमानतळावर हल्ला केल्यानंतर हवाई वाहतुकीवर परिणाम होणार असल्याची अफवा पसरली आहे.परंतु अधिकाऱ्यांनी हवाई वाहतुकीवर हल्ल्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटलं आहे.
दुबई प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'दुबई विमानतळाजवळ दोन ड्रोन डागण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात घानाचे दोन नागरिक, एक बांगलादेशी नागरिक,भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्याचा हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही'.
पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकलं आहे. इस्त्रायल आणि इराण देशाचे एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. इराणचे नवीन सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई या युद्धादरम्यान जखमी झाले आहेत. इराणच्या अध्यक्षांचे पुत्र यूयुफ पेजेशकियन यांनी दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर खामेनेई यांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.
पेजेशकियन यांनी पुढे म्हटलं की, 'नवीन सुप्रीम लीडर यांनी अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात त्यांच्या वडिलांना गमावलं. आता त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आलं आहे. ते आता सुरक्षित आणि ठीक आहेत'.
दुबई विमानतळाजवळ नेमकं काय घडलं?
दुबईत विमानतळाजवळ दोन ड्रोन डागण्यात आलेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
हल्ल्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला का?
विमानतळावरील हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.