युद्धाने टेन्शन वाढवलं, गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळेना; छोटे उद्योजक हवालदील

Iran israel war effect : इराण-इस्त्रायल युद्धामुळे छोटे उद्योजक हवालदील झाले आहेत. युद्धामुळे निर्यात महागल्याने छोट्या उद्योजकांचं टेन्शन वाढलं आहे.
iran israel war effect
iran israel war effect Saam tv
Published On
Summary

अमेरिका-इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना मोठा फटका

कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक हवालदिल

गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी उद्योजकांना फोम मिळेना

अमेरिका-इराण युद्धाचा मोठा फटका भारतातल्या छोट्या व्यापाऱ्यांना बसलाय. कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक पुरते हवालदिल झाले आहेत.

बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड हे दरवर्षी आपल्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दीड ते दोन लाख गणेशमूर्ती तसंच पूजेचं साहित्य 25 हून अधिक देशांमध्ये पाठवत असतात. मात्र युद्धामुळे पॅकिंगसाठी आवश्यक असलेलं फोम उपलब्ध होत नसल्याने परदेशात गणेशमूर्ती कशा पाठवायच्या असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. महत्त्वाचं म्हणजे या युद्धामुळे निर्यातही महागलीय.

iran israel war effect
मंत्र्यांवर अनैतिक संबंधाचा आरोप; बायकोने नको त्या अवस्थेत पाहिलं, राजकीय वर्तुळात खळबळ

शेकडो कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. ग्राहकांपर्यंत माल केव्हापर्यंत पोहोचेल, त्याची कोणतीच खात्री व्यापाऱ्यांना देता येत नाही. परदेशातील ग्राहकांनी या सर्व ऑर्डर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बुक केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे कच्च्या मालाची कमतरता, दुसरीकडे वाढलेली महागाई आणि तिसरीकडे युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता या तिहेरी कात्रीत निमेश जनवाड यांच्यासारखे शेकडो छोटे उद्योजक सापडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जनवाड यांनी केलीय.

iran israel war effect
टीम इंडियानं रचला नवा इतिहास; मायदेशात वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच देश

गॅस तुटवड्याचा कल्याणमधील हॉटेल व्यावसायिकांना फटका

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका कल्याण डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिकांना फटका बसल्याचे चित्र समोर येत आहे.

कल्याण शहरात सध्या कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लागणारा कमर्शियल गॅस वितरित होत नसल्याची तक्रार सातत्याने व्यावसायिकांकडून केली जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com