टीम इंडियानं रचला नवा इतिहास; मायदेशात वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच देश

india win cricket t20 world cup : अहमदाबाद येथील न्यूझीलंडविरुध्दचा अंतिम सामना जिंकून भारतानं सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकलाय. आजवर तिसऱ्यांदा टी-२० विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या कामगिरीवर नजर टाकूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Team India Squad
team indiayandex
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला अक्षरशः धूळ चारली. तब्बल 96 धावांनी दारूण पराभव करत भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकलाय. 2024 नंतर सलग दुसऱ्यांदा विश्वचषक फायनल जिंकून भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट जगतात आपला दबदबा पुन्हा एकदा निर्माण केलाय.

Team India Squad
टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर ईशानचा गर्लफ्रेंडसोबतचा फोटो चर्चेत

या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळलीये. क्रिकेट चाहत्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून सर्वजण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आलाय.

पण हा विजय टीम इंडियासाठी सोप्पा नव्हता, कारण समोर होता शांत आणि संयमी असा न्यूझीलंडचा क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी करणा-या टीम इंडियाने दमदार सुरुवात करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यात यश मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे, भारताची स्फोटक फलंदाजी अंतिम सामन्यात टर्निंग पॉईंट ठरली. सलामीवीर संजू सॅमसनने 89 धावांची शानदार खेळी केली तर मधल्या षटकांतली निर्णायक भागीदारी यामुळं संघाला 255 धावांचा डोंगर उभारता आला.

टीम इंडियानं दिलेल्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न अखेर व्यर्थ गेला. भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेलने न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना तंबूत धाडले. कसदार गोलंदाजीला उत्तम क्षेत्ररक्षणाची जोड मिळाली. या गोष्टींमुळे टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवत मायदेशात इतिहास घडविला.

Team India Squad
Cricketer Dies of Heart Attack: धाव घेताना तुटली आयुष्याची दोरी, मैदानात क्रिकेटपटूला आला हृदयविकाराचा झटका

अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराहला सामनावीर ठरला. तर 321 धावा करणारा सलामीवीर संजू सॅमसन मालिकावीर ठरला. या विजयामुळे आगामी स्पर्धांसाठी टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलाय. आता भारतीय संघाची नजर पुढील वर्षी होणाऱ्या Asia Cup आणि आगामी ICC ODI World Cup 2027 सारख्या स्पर्धांवर असणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com