Cricketer Dies of Heart Attack: धाव घेताना तुटली आयुष्याची दोरी, मैदानात क्रिकेटपटूला आला हृदयविकाराचा झटका

Cricketer Dies of Heart Attack During Live Match : क्रिकेटची मॅच खेळत असताना हार्ट अटॅक येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रत्नागिरी चिंचखरी येथे ही घटना घडलीय.
Cricketer Dies of Heart Attack During Live Match
Ratnagiri cricketer Pravin Pawar collapsed during a live cricket match; the tragic moment was caught on camera.saam tv
Published On
Summary
  • क्रिकेट सामना सुरू असताना खेळाडूला हृदयविकाराचा झटका

  • थेट प्रक्षेपणात संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

  • प्रवीण पवार हे रत्नागिरीतील नावाजलेले क्रिकेटपटू

अमोल कलये, साम प्रतिनिधी

दिवसेंदिवस हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होतेय.याचदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना घडलीय. येथे क्रिकेट सामन्यादरम्यान एका फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना घडली होती त्यावेळी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू होते.

दरम्यान खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, त्याचवेळी त्याला हॉर्ट अटॅक आला. मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव प्रवीण पवार असे आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरात क्रिकेटमध्ये स्वतःचे नाव कमावले होते. घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखारी येथे स्वराज प्रतिष्ठान आणि कोकण नगर संघांमध्ये क्रिकेट सामना होत होता. स्वराज प्रतिष्ठान संघाची फलंदाजी सुरू होती.

Cricketer Dies of Heart Attack During Live Match
Ind U19 vs Eng U 19 Final : ८० बॉल, १७५ रन्स, १५ फोर, १५ सिक्स....वैभव सूर्यवंशीची फायनलमध्ये तोडफोड इनिंग, इतिहास रचला!

संघाचा खेळाडू प्रवीण पवार नॉन स्ट्राइक क्रिझवर होता. त्यावेळी स्टार्इकवर असलेल्या फलंदाजाने धाव घेण्यासाठी फटका मारला. पण धाव घेता आली नाही, त्यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेला प्रवीण पवार धाव घेण्याच्या प्रयत्न करत होता,पण धाव पूर्ण झाली नाही. त्यावेळी परत आपल्या क्रिझवर परत येत असताना प्रवीण पवार जमिनीवर कोसळला. त्याला इतर खेळाडूंनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात वेगळेच होते.

Cricketer Dies of Heart Attack During Live Match
IND vs ENG U19 World Cup Final: भारताचं 'वैभव'! इंग्लंडला लोळवून टीम इंडिया ठरली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वविजेतेपदाचा षटकार

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये प्रवीण पवार नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असल्याचे दिसून येते, तर पार्थ नावाचा दुसरा खेळाडू स्ट्राइकवर होता. दोघेही स्वराज प्रतिष्ठान संघाकडून फलंदाजी करत होते. सामन्यादरम्यान, नॉन-स्ट्राइक एंडवर असलेल्या प्रवीणने चेंडू टाकल्यानंतर थोडे अंतर धावले आणि नंतर परतला त्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com