Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

Kalki 2898 Ad Movie : 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?
Kalki 2898 ADInstagram
Published On

'कल्की 2898 एडी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची फक्त देशातच नाही तर जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चनचा लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र या चित्रपटासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा आणि भावनांचा अनादर आणि अपमान करत आहे असे त्यांचे मत आहे.

Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?
Amitabh Bachchan Fitness : काय आहे अमिताभ बच्चन यांचा फिटनेस फंडा? ८१व्या वर्षी असा आहे डाएट प्लॅन

नोटीसमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हा चित्रपट हिंदू धर्मग्रंथांच्या विरोधात आहे असे म्हंटले आहे. या चित्रपटाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि आता ते या संदर्भात काय प्रतिसाद येतो याची वाट पाहत आहेत.

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, भगवान कल्की नारायण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे घटक आहेत. भगवान कल्की नारायण भगवान विष्णूंचे शेवटचे अवतार मानले जातात. भगवान कल्की यांच्या अवतारावर जनतेला विश्वास आहे. त्यांच्या श्रद्धेवर आधारित श्री कल्की धामची पायाभरणी देखील देशात करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी ही पायाभरणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?
Most Watch OTT Released Films : ओटीटीवर कोणत्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ? 'या' आहेत मोस्ट वॉच्ड फिल्म; सारा अली खानच्या दोन चित्रपटांचा समावेश

कायदेशीर नोटीसमध्ये प्रमोद कृष्णम म्हटले आहेत की, चित्रपटात भगवान कल्कीचे पात्र चुकीचे आणि अनादर करणारे दाखवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा गोंधळ होऊ शकतो आणि हिंदू धर्माचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो शिवाय हिंदूंच्या भावना दुखावू शकतात.

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट सन 2898 मधील हिंदू धर्मग्रंथांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या कायदेशिर नोटीसने दिग्दर्शकांसह कलाकारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?
Sonia Bansal Hospitalized : ‘बिग बॉस १७’ फेम सोनिया बन्सल रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीला नेमकं काय झालंय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com