Bageshwar Dham News: मुस्लिम कुटुंबातील 9 जणांनी स्वीकारला हिंदू धर्म, बागेश्वर बाबांच्या हस्ते घेतली दीक्षा

Bageshwar Dham News: अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी बुधवारी धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्म स्वीकारला आहे.
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna ShastriSaam Digital
Published On

Bageshwar Dham News

छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी बुधवारी धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्म स्वीकारला. लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करीत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केल्या आहेत.

जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. व्यवसायाने मजूर असलेले शेख लहानपणापासून हिंदू रिवाजांनुसार पूजापाठ करत आहेत. त्यांना हिंदू धर्मात यायचे होते. त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना या कार्यक्रमात या धर्मांतराची संधी मिळवून दिली. या धर्मांतरासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhirendra Krishna Shastri
Nashik Water Supply News : सातपूरसह, नाशिक पश्चिमचा पाणीपुरवठा खंडित; जाणून घ्या कारण

हे सर्व लोकं आपल्या इच्छेने हिंदू धर्मात दाखल झाले असून अनेक दिवसांपूर्वी त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सहा ते सात महिने त्यांच्यासोबत राहून त्यांची हिंदू धर्माविषयी आस्था आणि इच्छेबाबत सर्व माहिती जाणून घेतली. अखेर त्यांची धीरेंद्र शास्त्री यांच्याशी आज भेट घडवून आणली, अशी माहिती बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल भंडारी दिली.

बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातन धर्म जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण आज इथे पोहोचलो असून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे जमीर शेख यांनी सांगितले.

Dhirendra Krishna Shastri
Eknath Khadse Health Update : लवकरच सेवेत रूजू होईल...; एकनाथ खडसेंची हॉस्पिटलमधून पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com