Nashik Water Supply News : सातपूरसह, नाशिक पश्चिमचा पाणीपुरवठा खंडित; जाणून घ्या कारण

उद्या सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणीपुरवठा असे सांगण्यात आले आहे.
nashik water supply
nashik water supplySaam TV
Published On

Nashik News : ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच नाशिक पश्चिम आणि सातपूर परिसरात पाणीपूरवठा खंडीत झाला आहे. या दोन्ही भागातील पाणीपुरवठा आज (गुरुवार) बंद राहणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. (Maharashtra News)

nashik water supply
Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी देऊ नका... उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५ डिसेंबरला सुनावणी

गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २३ वर्षे जुन्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नाशिक महापालिकेकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या (शुक्रवार) सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असेही सांगण्यात येत आहे.

य़ा परिसरात पाणीपुरवठा हाेणार नाही

सातपूर परिसर

प्रभाग क्रमांक ८ - बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाइपलाइन रोड, काळेनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, काळेनगर, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर.

प्रभाग क्रमांक ९ - ध्रुवनगर जल कुंभ परिसर, ध्रुवनगर, मोतीवाला कॉलेज परिसर, हनुमाननगर, संभाजीनगर, शिवशक्ती कॉलनी.

प्रभाग क्रमांक १० - अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर.

प्रभाग ११ - प्रबुद्धनगर.

nashik water supply
Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

नाशिक पश्चिम परिसर

प्रभाग ७ - नहुष जलकुंभ, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंदनगर, डी. के. नगर, शांतिनिकेतन सोसायटी परिसर, आयचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामराज्य जलकुंभ- सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल परिसर, जहान सर्कल परिसर, डिसूझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस. टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परीसर.

प्रभाग १२ मधील यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसूझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर.

Edited By : Siddharth Latkar

nashik water supply
Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांना विराेध, पंढरपुरात मंदिर समितीची बैठक उधळली (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com