Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड

Kalki 2898 AD Day 11 Collection : नागअश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन ११ दिवस झाले आहेत. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत आहे.
Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड
Kalki 2989 AD Star CastSaam Tv

भारतीय सिनेसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष खास ठरलं, असं म्हटलं वावगं ठरणार नाही. 'पठान', 'जवान', 'रॉकी रानी की प्रेम कहाणी', 'ॲनिमल' या चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. पण त्यामानाने २०२४ मध्ये अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'कल्की २८९८ एडी' चित्रपट पण बऱ्यापैकी हिट झालेला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. चित्रपट रिलीज होऊन ११ दिवस झाले असले तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे, जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड
Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

नागअश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर २८ जूनला रिलीज झालेला आहे. चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत जगभरात ८०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने देशभरामध्ये, एका आठवड्यात ४१५कोटींची कमाई केलेली आहे. तर नवव्या दिवशी १६.७० कोटी, दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी ३४.१५ कोटी तर ११ व्या दिवशी म्हणजेच रविवारी ४४.३५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये भरघोस वाढ ही विकेंडलाच झालेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाने देशभरामध्ये, ५१२.५१ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये, चित्रपटाने ८३२ कोटींची कमाई केलेली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या, 'गदर २'ने दोन आठवड्यामध्ये ४०० कोटींची कमाई केलेली होती. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये 'गदर २'चा रेकॉर्ड मोडित काढला होता. दरम्यान, कल्कीने फक्त 'गदर २'चाच रेकॉर्ड मोडित काढला नाही तर, 'बाहुबली २'चाही रेकॉर्ड मोडित काढला होता. या चित्रपटाचे कौतुक फक्त प्रेक्षकांकडूनच केले जात नाही तर, समीक्षकांनी आणि अनेक सेलिब्रिटींनीही केले आहे.

Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड
Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात सुमारे ८५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. 2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड
Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com