Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

Game Changer Shooting Wrap Up : अभिनेता रामचरण 'RRR' चित्रपटानंतर 'गेम चेंजर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्याने चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट सोशल मीडियावर शेअर केलेली आहे.
Game Changer Shooting Wrap Up
Game Changer PosterSaam Tv
Published On

टॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रत्येक चित्रपटाची नेहमीच चाहत्यांमध्ये एक भलतीच क्रेझ पाहायला मिळते. अभिनेता रामचरणच्या 'RRR' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळीच छाप पाडली आहे. हा चित्रपट तीन वर्षांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाची फक्त देशातच नाही तर जगभरात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा 'गेम चेंजर' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रामचरण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच चित्रपटाची शुटिंग संपल्याची माहिती स्वत: अभिनेत्याने इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

Game Changer Shooting Wrap Up
Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

'गेम चेंजर' चित्रपटाची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. चित्रपटाच्या शुटिंगला ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरूवात झाली होती. रामचरणसोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, कियारा अडवाणीही दिसणार आहे. नुकतंच रामचरणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याने शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच चित्रपटाची शुटिंग संपल्याची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये रामचरण हॅलिकॉप्टरमध्ये बसायला जाताना दिसत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या लवकरच एडिटिंगच्या कामाला सुरूवात होईल.

एस. शंकर चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. एस. शंकर यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. तसेच बॉक्स ऑफिसवरही त्यांच्या चित्रपटांनी मोठी कमाई देखील केलीये. आता प्रेक्षकांना त्यांच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या साऊथ व्हर्जनचे ओटीटी राइट्स ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने १०५ कोटींना विकत घेतले आहेत. तर हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘झी ५’ विकत घेतले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर करत असून चित्रपटात रामचरणसह कियारा अडवाणी ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिल राजू आणि शिरीष या चित्रपटाचा निर्माते आहेत.

Game Changer Shooting Wrap Up
Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या गाण्यांवर ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटामध्ये ट्रेनचा एक ॲक्शन सीन आहे, जो सुमारे ७ मिनिटांचा असणार आहे. केवळ त्या सीन्ससाठी निर्मात्यांनी तब्बल किंमत ७० कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती २५० कोटी रुपयांमध्ये झाली आहे. राम चरणच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट थिएटरमध्ये, २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Game Changer Shooting Wrap Up
Alia Bhatt On Raha Kapoor : दोन वर्षांच्या राहा कपूरला पुस्तकांची आवड, आई आलियाने सांगितल्या लेकीच्या आवडीनिवडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com