Alia Bhatt On Raha Kapoor : दोन वर्षांच्या राहा कपूरला पुस्तकांची आवड, आई आलियाने सांगितल्या लेकीच्या आवडीनिवडी

Alia Bhatt Interview : सध्या राहा तिच्या काही सवयींमुळे चर्चेत आली आहे. राहा रोज रात्री पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही, असं तिच्या आईने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Alia Bhatt, Raha Kapoor, Ranbir Kapoor
Alia Bhatt On Raha Kapoor Instagram/ @

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. ते कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. आलिया- रणबीरची लेक राहा कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राहा अजून दोन वर्षांचीही नाही तोच तिची सोशल मीडियावर चर्चा होते. सध्या राहा तिच्या काही सवयींमुळे चर्चेत आली आहे. राहा रोज रात्री पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही, असं तिच्या आईने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Alia Bhatt, Raha Kapoor, Ranbir Kapoor
Neetu Singh Birthday : १५ वर्षांच्या नीतू सिंह २१ वर्षांच्या ऋषी कपूरच्या पडल्या प्रेमात; आईचा विरोध असूनही झाली सक्सेस लव्हस्टोरी, जाणून घ्या...

नुकतंच अभिनेत्री आलिया भट्ट हिने हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये राहाच्या सवयींबद्दल सांगताना आलियाने सांगितलं की, "मी रोज रात्री झोपताना राहाला काही पुस्तकं वाचून दाखवते. अशी एकही रात्र जात नाही, त्यारात्री राहाला पुस्तक वाचून दाखवलं नाही. कधी कधी तर तिला दुपारचंही आम्ही पुस्तक वाचून दाखवतो. खरंतर तिला इतक्या लहान वयात पुस्तक वाचण्याची सवय फार उत्तम आहे. मी किंवा रणबीर आम्ही दोघंही तिला पुस्तक वाचून दाखवत असताना तिला झोप लागून जाते. कधी कधी तर ती त्या पुस्तकांना मिठीही मारून झोपते. "

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि राहा कपूरचा पुस्तक वाचतानाचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच तिला पुस्तकाची आवड असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाने स्वत: लहान मुलांसाठी एक पुस्तक लाँच केलं होतं. तिच्या त्या पुस्तकाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. आलियाच्या कामाबद्दल सांगायचं तर, गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या 'अल्फा' नावाच्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. तिच्यासोबत चित्रपटात शर्वरी वाघही दिसणार आहे.

Alia Bhatt, Raha Kapoor, Ranbir Kapoor
Alyad palyad 2 : पुन्हा एकदा उडणार प्रेक्षकांच्या भितीचा थरकाप; 'अल्याड पल्याड २'ची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com