Nilesh Sabale: 'म्हणून मी झी मराठी सोडण्याचा निर्णय घेतला...'; निलेश साबळेने सांगितलं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण

Nilesh Sabale On Chala Hawa Yeu Dya Show: अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि सूत्रसंचालक अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारा कलाकार म्हणजे निलेश साबळे. निलेश साबळे अनेक मालिका, कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निलेश साबळे लवकरच 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Nilesh Sabale
Nilesh SabaleSaam Tv

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि सूत्रसंचालक अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारा कलाकार म्हणजे निलेश साबळे. निलेश साबळे अनेक मालिका, कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निलेश साबळे लवकरच 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम झी मराठी नव्हे तर कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम का बंद झाला याबद्दल भाष्य केलं आहे.

निलेश साबळेने नुकतीच लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने चला हवा येऊ द्या कार्यक्रम का बंद झाला याबद्दल माहिती दिली आहे. निलेश साबळेने सांगितले की," कार्यक्रम बंद करायचा की नाही हा सर्वस्वी चॅनलचा निर्णय होता. मी झी मराठीचे खूप आभार मानेन. माझ्या करिअरची सुरुवातच झी मराठीपासून झाली. पण काय झालं की प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट हा चॅनलने ठरवलेला असतो. तर त्यांना असं वाटतं होतं की हा कार्यक्रम एका गॅपवर जायला हवा होता. थोडं आपण सर्वांनी बसून या विषयावर बोलायला हवं. नवीन काही करता येईल का याच्यावर विचार करायला हवा म्हणून कार्यक्रम गॅपवर जायला हवा. त्यासाठी आम्हाला जो गॅपचा कालावधी सांगितला होता तो खूपच मोठा होता. आमची बोलणी जवळपास नोव्हेंबर-जानेवारीमध्ये झाली होती. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की, कार्यक्रम पुढच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरु होईल. हा ७-८ महिन्यांचा गॅप खूपच मोठा होता."

'माझ्यातील कलाकार, लेखक म्हणून हा गॅप खूप मोठा वाटत होता. मला पर्सनली असं वाटतं की, तुम्ही जर कलाकार म्हणून १५ दिवस दिसला नाही तर लोक सोळाव्या दिवशी तुम्हाला विसरतात. त्यामुळे जर ही टीम ८-९ महिने एकत्र एका कार्यक्रमात दिसली नाही तर लोक आम्हाला विसरतील. बाकी तुम्ही इतर अवॉर्ड शोमध्ये स्किट करा, सूत्रसंचालन करा. मात्र, त्या कार्यक्रमात दिसला नाहीत तर लोक विसरतात. मी एका शोमध्ये अँकरिंग करतोय, भाऊ दुसरीकडे मालिका करतोय यामुळे टीमही विखुरली जाईल आणि त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही जी चौकट आखली होती तीदेखील मोडून जाईल. कालांतराने लोक म्हणतील तुम्ही आता नाही आलात तरी चालेल. त्यामुळे मला हे कुठेतरी चुकीचे वाटत होतं. असाही काही भाग नव्हता की, लोक कार्यक्रम बघत नव्हते. लोक आम्हाला येईन विचारायचे की, कार्यक्रम कधी सुरु होणार. त्याचवेळी मला एक फोन आला त्यांनी कार्यक्रमाबद्दल विचारणा केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रवास सुरु झाला.' असंही त्याने सांगितले.

Nilesh Sabale
Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल करत तपास सुरू

निलेश साबळे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, ओंमकार भोजणे, सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण दिसणार आहेत.

Nilesh Sabale
OTT Released This Week: 'या' आठवड्यात पाहायला मिळणार ॲक्शन, ड्रामा अन् थ्रिलर असणाऱ्या कलाकृती, जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com