OTT Released This Week: 'या' आठवड्यात पाहायला मिळणार ॲक्शन, ड्रामा अन् थ्रिलर असणाऱ्या कलाकृती, जाणून घ्या...

Upcoming Movies And Web Series : २१ एप्रिल ते २७ एप्रिल या दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही घरात बसून ॲक्शन, थरार आणि नाट्य असणारे चित्रपट पाहू शकतात.
OTT Release Film And Web Series
OTT Release Film And Web SeriesSaam Tv

OTT Movies and Web Series Released (21 April To 27 April)

दिवसेंदिवस प्रेक्षकांचे मनोरंजनाचे माध्यम बदलत आहे. सध्या प्रेक्षकांचा ओटीटीवरील कल सर्वाधिक वाढला आहे. ओटीटी म्हणजे प्रेक्षकांसाठी एकप्रकारे मनोरंजनाचा खजिनाच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सध्या मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचाही आनंद लुटताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये म्हणजेच, २१ एप्रिल ते २७ एप्रिल या दिवसांत प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरीज आणि वेब शो पाहायला मिळणार आहेत. (OTT Platform)

तुम्हीही जर घरबसल्या एखादा चांगला चित्रपट किंवा वेबसीरीज पाहायचा विचार करत असाल तर जाणून घ्या 'या' आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार आहे? नेटफ्लिक्स (Netflix), ॲमेझोन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video), डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना या सीरिज वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरीज आणि वेब शो पाहायला मिळतील. (Bollywood Film)

OTT Release Film And Web Series
Salman Khan's Galaxy Apartment: गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याच्या तयारीत; 'या' ठिकाणी होणार शिफ्ट

रणनीती : बालाकोट ॲन्ड बियॉन्ड (Ranneeti: Balakot And Beyond) २४ एप्रिल २०२४ Jio Cinema

'रणनीती: बालाकोट ॲन्ड बियॉन्ड' (Ranneeti: Balakot And Beyond) वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत जिमी शेरगिल, आशुतोष राणा आणि लारा दत्ता आहे. २०१९ मध्ये झालेल्या बालाकोट हवाई दलावर आधारित या वेबसीरीजचे कथानक आहे. ॲक्शन, थ्रिलर वेबसीरिज येत्या २४ एप्रिलपासून जिओ सिनेमावर पाहता येईल.

दिल दोस्ती दिलेम्मा (Dil Dosti Dilemma) २५ एप्रिल २०२४ Amazon Prime Video

'दिल दोस्ती डिलेमा' (Dil Dosti Dilemma) या वेब शोमध्ये प्रेक्षकांना ड्रामा पाहायला मिळणार आहे. येत्या २५ एप्रिल २०२४ला ॲमेझोन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release Film And Web Series
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर

भीमा (Bhimaa) २६ एप्रिल २०२४ Disney Plus Hotstar

'भीमा' (Bhimaa) चित्रपटाचे कथानक एका छोट्या शहरातल्या मंदिरामध्ये घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित आहे. ॲक्शन आणि ड्रामा असणारा हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी 'डिज्नी प्लस हॉटस्टार'वर (Disney Plus Hotstar) रिलीज होणार आहे. (Bollywood News)

क्रॅक (Crack) २६ एप्रिल २०२४ Disney Plus Hotstar

अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत असलेले 'क्रॅक' चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. मुंबईतील एका स्टंटमॅनवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)

OTT Release Film And Web Series
Gaurav More Video : ‘मॅडनेस मचाएंगे’मध्येही गौरव मोरेचीच हवा, हटक्या पद्धतीने केलं जुही चावलाला इम्प्रेस; पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com