Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर

Latest Update on Salman Khan Home Firing Case: २२ एप्रिलला मुंबई गुन्हे शाखेची टीम आरोपींना घेऊन पिस्तुलाच्या शोधात गुजरातमध्ये दाखल झाली होती. आता नुकतंच पोलिसांनी तापी नदीतून आरोपींनी फेकलेल्या दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि १३ जिवंत काडतूसं जप्त केले आहेत.
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर
Salman Khan House Firing Case Update: Pistol Found in Gujrat's Tapi RiverSaam Tv
Published On

Salman Khan House News

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या घटनेमध्ये सतत वेगवेगळी माहिती समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल (सोमवारी- २२ एप्रिल) मुंबई गुन्हे शाखेची टीम आरोपींना घेऊन पिस्तुलाच्या शोधात गुजरातमध्ये दाखल झाली होती. आता त्या पिस्तुलाचा शोध लागलेला आहे. नुकतंच पोलिसांकडून तापी नदीतून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि १३ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. (Bollywood)

Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर
Gaurav More Video : ‘मॅडनेस मचाएंगे’मध्येही गौरव मोरेचीच हवा, हटक्या पद्धतीने केलं जुही चावलाला इम्प्रेस; पाहा व्हिडीओ

पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी गुजरातमधील सुरत शहरातल्या तापी नदीमध्ये शोधमोहीम राबवली होती. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक मुंबई गुन्हे शाखेच्या पथकासोबत उपस्थित होते. गुन्हे शाखेने स्थानिक मच्छिमार आणि पाणबुड्या यांच्या मदतीने तापी नदीमध्ये पिस्तुलाचा शोध सुरू केला. गेल्या आठवड्यामध्ये, विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोघांनाही अटक करण्यात आली. या हल्लेखोरांनी सलमानच्या घरावर हल्ला केल्यानंतर मुंबईहून रस्त्याच्या मार्गाने गुजरातमधील सुरतला पळ काढला. (Bollywood News)

खरंतर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना भुजमधून अटक करण्यात आले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस भाविक बनले होते. हल्लेखोर मंदिरात बेसावध झोपले होते. अशातच त्यांना पोलिसांनी पकडलेले होते. सुरतमधून भूजला ट्रेनने जात असताना, रेल्वे पुलावरून त्यांनी तापी नदीमध्ये पिस्तुल फेकून दिली होती. अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यासोबतच आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी गोळीबारानंतर त्यांच्याकडे असलेले हत्यार तापी नदीमध्ये फेकून देत त्याची विल्हेवाट लावली होती. पण, सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवस केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि १३ जिवंत काडतूसं शोधण्यात यश मिळाले आहे. (Gujrat)

Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर
Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव, काय आहे प्रकरण?

आरोपींनी गोळीबार वॉर्निंग म्हणून नाहीतर त्याची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. भूजमधून विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला मुंबई पोलिस आणि कच्छ पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे १६ एप्रिलला अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. (Entertainment News)

Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर अलिबागमध्ये घेतली जमीन, किंमत वाचून भुवया उंचावतील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com