Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर अलिबागमध्ये घेतली जमीन, किंमत वाचून भुवया उंचावतील

Amitabh Bachchan Alibag New Property: बिग बी यांनी अयोध्येनंतर आता अलिबागमध्ये कोट्यवधींची नवीन जागा खरेदी केली आहे.
Amitabh Bachchan Bought New Property
Amitabh Bachchan Bought Alibag New PropertySaam Tv
Published On

Amitabh Bachchan Bought Alibag New Property

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहे. काल बिग बी यांचा 'कल्की २८९८ AD' चित्रपटातला लूक रिलीज झाला. अशातच बिग बी बच्चन आणखी एका कारणामुळे चर्चेत आलेले आहेत. बिग बी यांनी अयोध्येनंतर आता अलिबागमध्ये नवीन जागा खरेदी केली आहे. त्यांनी मुंबईच्या शेजारी असलेल्या अलिबागमध्ये त्यांनी कोट्यवधींची जागा खरेदी केली आहे.

Amitabh Bachchan Bought New Property
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, हल्लेखोरांकडून पनवेलच्या फार्महाऊसवर हल्ल्याचा कट, पुढे नेमकं काय झालं?

अमिताभ बच्चन यांनी जानेवारी २०२४ मध्ये, अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर जमीन खरेदी केली होती. आता बिग बींनी अलिबागमध्ये १० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. 'द हाउस ऑफ अभिनंदन लोढा' (HoABL) यांच्याकडून १०,००० चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ यांनी 'ए अलिबाग' या प्रोजेक्टमध्ये प्लॉट खरेदी केला आहे, जो अलिबागमधील सध्या डेव्हलपमेंटमध्ये असलेला प्रोजेक्ट आहे. २० एकरावर पसरलेला हा प्रोजेक्ट असून त्याची किंमत तब्बल १० कोटींची आहे. मात्र, या खरेदीवर अभिनेत्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या आधी शाहरुख खान, शाहरुख खानची लेक सुहाना, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांसारख्या स्टार्सनीही अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याआधी अमिताभ यांनी शरयू नदीच्या काठी असलेल्या 'द शरयू प्रोजेक्ट'मध्ये जमीन खरेदी केली होती. विकत घेतलेल्या ह्या जागी ते ७ स्टार एन्क्लेव्ह बनवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ त्या जागी १०,००० स्क्वेअर फूट जागेवर घर बांधू इच्छित आहेत. त्याची किंमत १४. ५ कोटी आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटींचाही अलिबागमध्ये प्लॉट खरेदी करण्यासाठी ओढा जास्त आहे.

Amitabh Bachchan Bought New Property
Manoj Bajpayee Net Worth: अवघ्या २०० रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक; जाणून घ्या मनोज वाजपेयीबद्दल...

दरम्यान जानेवारी २०२४ मध्ये, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत १४.५ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. त्यावेळी हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये बिग बींनी १०,००० चौरस फूट जमीन १४.५ कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे वृत्त होते. बिग बींनी ही खरेदी अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही काळ आधी केली होती. (Entertainment News)

Amitabh Bachchan Bought New Property
Happy Birthday Manoj Bajpayee: चार वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही ड्रामा स्कुलमध्ये प्रवेश, कसा बनला मनोज वाजपेयी अभिनयविश्वाचा ‘सरदार खान’

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com