Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, हल्लेखोरांकडून पनवेलच्या फार्महाऊसवर हल्ल्याचा कट, पुढे नेमकं काय झालं?

Salman Khan News: सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. अभिनेत्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर ईदच्या दिवशी हल्लेखोरांनी हल्ल्याचा कट आखल्याचा संशय आहे.
Plan Was To Hit Salman Khan At Panvel Farmhouse
Plan Was To Hit Salman Khan At Panvel FarmhouseSaam Tv

Salman Khan House Firing Case Update

अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञातांनी दुचाकीवरून पाच राउंड फायरिंग केली. १४ एप्रिलला पहाटे ही घटना घडली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने तपास करत दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर ईदच्या दिवशी हल्लेखोरांनी हल्ल्याचा कट आखल्याचा संशय आहे. पण यंदाची ईद सलमानच्या कुटुंबीयांनी पनवेलमध्ये नाही तर मुंबईमध्ये सेलिब्रेट केली होती. (Bollywood)

Plan Was To Hit Salman Khan At Panvel Farmhouse
Manoj Bajpayee Net Worth: अवघ्या २०० रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक; जाणून घ्या मनोज वाजपेयीबद्दल...

सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर ईदच्या दिवशी हल्लेखोरांनी हल्ल्याची योजना आखल्याचा संशय असल्याचे वृत्त मिड-डेने दिले आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानचे कुटुंबीय अनेकदा सण साजरे करण्यासाठी किंवा धम्माल मस्ती करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत येतात. त्याचमुळे त्यांनी ईदच्या दिवशी हल्ल्याचा कट रचल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करणाऱ्या विकीने आणि सागरने सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसजवळ असलेल्या हरिग्राम गावात घर भाड्याने घेतले होते. त्यासोबतच हल्ल्यावेळी वापरलेली बाईकही त्यांनी पनवेलमध्येच विकत घेतली होती. (Bollywood News)

Plan Was To Hit Salman Khan At Panvel Farmhouse
Happy Birthday Manoj Bajpayee: चार वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही ड्रामा स्कुलमध्ये प्रवेश, कसा बनला मनोज वाजपेयी अभिनयविश्वाचा ‘सरदार खान’

२०,००० रुपयांना ही दुचाकी विकत घेतलेली होती. त्यांनी अनेक वेळा त्या बाईकवरून प्रवासही केलेला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला संशय आहे की, दोन्ही हल्लेखोरांनी ईदच्या दिवशी सलमानवर हल्ला करण्याची योजना आखली होती. कारण तो अनेकदा त्याच्या पनवेलच्या घरी कुटुंबासोबत ईद साजरी करतो. गोळीबारानंतर पळून जाण्यासाठी पनवेलमधून सोप्पं आहे. मात्र, यावर्षी सलमानने त्याच्या पनवेल फार्महाऊसवरची ईद पार्टी रद्द केली. १० एप्रिल रोजी सलमान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतल्या घरी होता. ईदच्या दिवशी विकी आणि सागरने सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसची पाहणीही केली होती. ईदच्या दिवशी गोळीबार करण्याचा हल्लेखोरांचा कट असल्याचा आम्हाला संशय आहे. पण त्यांचा तो कट फसला." (Panvel News)

Plan Was To Hit Salman Khan At Panvel Farmhouse
The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी येणार भेटीला

आरोपींनी गोळीबार वॉर्निंग म्हणून नाहीतर त्याची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. त्या ठिकाणाहून विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला पोलिसांनी अटक केली होती. आरोपींनी तापी नदीत पिस्तूल फेकल्याचा दावा आरोपींनी गुन्हे शाखेकडे केला होता. गोळीबार प्रकरणात वापरलेल्या पिस्तूलच्या शोधात गुन्हे शाखेच पथक आहे. विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला पोलिसांनी कच्छ मधून अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. (Entertainment News)

Plan Was To Hit Salman Khan At Panvel Farmhouse
Pankaj Tripathi च्या मेहुण्याच्या कारला असा झाला अपघात, घटनेचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com