Pankaj Tripathi च्या मेहुण्याच्या कारला असा झाला अपघात, घटनेचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ व्हायरल

Pankaj Tripathi Brother In Law Accident CCTV Video: अपघाताची ही घटना बिहारमध्ये दिल्ली-कोलकाता हायवेवर घडली. या भीषण कार अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pankaj Tripathi Brother In Law Accident CCTV Video
Bihar Car AccidentSaam TV
Published On

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) याचा मेहुणा राजेश तिवारी यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पंकज त्रिपाठी आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. ही घटना बिहारमध्ये दिल्ली-कोलकाता हायवेवर घडली. या भीषण कार अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीटीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अपघाताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये झारखंडमधील ग्रँड ट्रंक रोडजवळील निरसा मार्केटमधील रस्ता दिसत आहे. या रस्त्यावरून दोन्ही दिशेने वाहनं येताना आणि जाताना दिसत आहेत. अशामध्ये पांढऱ्या रंगाची भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याचे दिसत आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये असणारे राजेश तिवारी आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने राजेश तिवारी आणि त्यांच्या पत्नीला तात्काळ धनबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी राजेश यांना मृत घोषित केले. तर त्यांची पत्नी सरितावर सध्या उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांची देखील प्रकृती गंभीर आहे. सरिता आपल्या पतीसोबत बिहारमधील गोपालगंजमधील कमालपूर येथून पश्चिम बंगालमधील चित्तरंजनला जात होती.

Pankaj Tripathi Brother In Law Accident CCTV Video
Nilesh Sable New Show: निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीज

निरसा बाजार चौकात येण्यापूर्वी त्यांची भरधाव कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. पंकज त्रिपाठीचे मेहुणे राजेश हे भारतीय रेल्वेत काम करत होते आणि ते पश्चिम बंगालच्या चित्तरंजन येथे कार्यरत होते. हा अपघात झाला तेव्हा ते आपल्या गावावरून चित्तरंजनकडे जात होते. सरिताच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. या घटनेबाबत पंकज किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Pankaj Tripathi Brother In Law Accident CCTV Video
Rakhi Sawant News: राखी सावंतवर अटकेची टांगती तलवार, सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यात सरेंडर करण्याचे दिले आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com