Rakhi Sawant News
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. सध्या राखी सावंत तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. राखी सावंतला एक्स पती आदिल दुर्रानी याचा अश्लील व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, चार आठवड्यात तिला सरेंडर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यासोबतच अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांपूर्वी जामीनासाठी याचिका दाखल केला होती, ती याचिका ही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (Bollywood)
आदिल दुर्रानीने राखीवर त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर लिक केल्याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आदिल खान दुर्रानीने अभिनेत्रीविरोधात एफआयआर अर्ज दाखल केल्यानंतर ती दुबईमध्ये वास्तव्यास होती. रिपोर्ट्सनुसार, या एफआयआरनंतर राखी अटक टाळण्यासाठी दुबईला पळून गेली होती. राखीचा एक्स पती आदिल दुर्रानी ह्याचे अश्लील व्हिडीओ लिक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. (Bollywood News)
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आदिलच्या तक्रारीनंतर अभिनेत्रीवर भादवि कलम ५०० अन्वये आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ प्रकाशित केल्याच्या कलम ३४ अंतर्गत मानहानीचा आरोप केला. त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अर्ज फेटाळून लावल्याने राखीच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी राखी सावंतवर न्यायालयाची टांगती तलवार कायम आहे. (Rakhi Sawant)
डिसेंबर २०२२ मध्ये राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यासोबतच अभिनेत्रीनेही आदिल दुर्रानीशी लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. या लग्नाला आदिलनेही दुजोरा दिला होता. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच राखीने आदिलवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.