संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'रामलीला' चित्रपट २०१५ मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने देशासह जगभरामध्ये कोट्यवधींची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटापासूनच दीपिका आणि रणवीरच्या रिलेशनची चर्चा रंगली होती. या चित्रपटापासूनच दोघांच्याही डेटिंगची चर्चा झाली होती. पण संजय लीला भन्साळी यांनी 'रामलीला' चित्रपटासाठी दीपिकाच्या आधी करीना कपूरला विचारलं होतं. पण तिने ह्या चित्रपटाला नकार दिला होता. नेमका तिने चित्रपटाला का नकार दिला ? जाणून घेऊया...
Deepika Padukone Ranveer Singh Yet To Thank Her For Not Doing Ram Leela
नुकतंच करीनाने बीबीसी एशियाला मुलाखत दिली. करीनाने 'रामलीला' चित्रपटाला नकार दिला होता, म्हणून दीपिका आणि रणवीर सिंगने तिचे आभार मानायला हवे होते. असं ती मुलाखतीत म्हणाली आहे. करीना कपूर खान मुलाखतीमध्ये म्हणाली, " मी 'रामलीला' चित्रपटाला नकार दिला होता, म्हणून दीपिका आणि रणवीर सिंगने माझे आभार मानायला हवे होते. माझा नियतीवर विश्वास आहे. जीवनात जे काही घडतं, ते कोणत्याही पद्धतीने आपल्यासोबत घडू शकते, यावर माझा विश्वास आहे. सगळं काही नशीबात असतं. पण, सगळं काही मिळणं प्रत्येकासाठी लिहिलेलं नसतं." असं अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'रामलीला'च्या आधी करीनाला 'देवदास'साठी ऐश्वर्या रायच्या आधी करीना कपूरला कास्ट केले होते. दिग्दर्शकांनी तिची स्क्रीन टेस्टही घेतली होती. इतकंच नाही तर करीनाला त्या चित्रपटासाठी ॲडव्हान्स पैसेही दिले होते. पण नंतर ऐश्वर्याला चित्रपटात कास्ट करण्यात आले. यामुळे करीना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर कमालीची संतापली होती. एका जुन्या मुलाखतीत करीनाने सांगितले की, "माझ्याकडे कोणताही चित्रपट नसला तरी चालेल, पण मी संजय भन्साळींसोबत काम करणार नाही." (Bollywood Film)
करीना कपूर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, करीना कपूर शेवटची ‘क्रु’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. आता या चित्रपटानंतर करीना ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. तिच्या सोबत चित्रपटामध्ये, करीना कपूर खानसोबत अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ मल्टीस्टारकास्ट पाहायला मिळेल. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.