Varun Dhawan Wife Baby Shower : थाटामाटात पार पडले वरुण धवनच्या बायकोचं बेबी शॉवर; फोटोंची होतेय चर्चा

Varun Dhawan And Natasha Dalal News : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा दलालचं बेबी शोवर पार पडलं. बेबी शोवरच्या पार्टीतल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby Shower
Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby ShowerSaam Tv

Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby Shower

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून आनंदाची बातमी दिली होती. वरुण धवनच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नुकतंच वरुणची पत्नी नताशा दलालचं (Natasha Dalal) बेबी शोवर पार पडलं आहे. (Varun Dhawan Wife Baby Shower) हे बेबी शोवर पार्टीचे आयोजन वरुण धवनच्या कुटूंबाने केली होती. ह्या बेबी शोवरच्या पार्टीतल्या फोटोंची सध्या नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे.

Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby Shower
Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी गोळीबारानंतर पिस्तुलाचं काय केलं?

वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल लवकरच आई-बाबा होणार असल्यामुळे दोघेही खूपच आनंदी आहेत. सध्या बेबी शोवर पार्टीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यावेळी वरुण आणि नताशाचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. नताशाने बेबी शोवर पार्टीसाठी ऑफ शोल्डर फ्रॉक वेअर केला होता तर वरुणने व्हाईट टीशर्ट आणि त्यावर ब्लु प्रिंटेड शर्ट वेअर केला होता. (Bollywood News)

शाहिद कपूरची बायको मीरा कपूरने सुद्धा या पार्टीला हजेरी लावत या जोडीचं अभिनंदन केलं. बेबी शोवर पार्टीतले फोटो आणि व्हिडीओ अद्याप समोर आलेले नाहीत. शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केकचा फोटो शेअर केला होता. सध्या त्या केकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. नताशा आणि वरुणने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पापराझींसाठी देखील खास गिफ्ट पाठवले. बाळाच्या आगमनाच्या खुशीत वरुण आणि नताशाने मिठाई वाटली. (Bollywood)

Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby Shower
अंगावर बँडेज अन् तीक्ष्ण नजर..., बिग बी बच्चन यांचा 'अश्वत्थामा'चा लूक रिलीज; 'Kalki 2898 AD'ची चर्चा

गेल्या काही दिवसांपूर्वी, अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो पोस्ट करत ते दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असल्याची माहिती दिली होती. वरुणने नताशच्या बेबी बंपला किस करतानाचा फोटो शेअर केला होता. त्याने ही बातमी शेअर केल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. २४ जानेवारी २०२१ रोजी वरुण आणि नताशाचे अलिबागमध्ये लग्न झाले होते. बराच काळ दोघांनीही एकमेकांना डेट केल्यानंतर ह्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांनी वरुण आणि नताशा लवकरच पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. (Entertainment News)

Varun Dhawan Wife Natasha Dalal Baby Shower
Chris King Dies : प्रसिद्ध रॅपरचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन, चाहत्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com