Kareena Kapoor 2024 Resolution: करीना कपूर नवीन वर्षात काय संकल्प करणार? अभिनेत्रीने सोशल मीडियावरून केला खुलासा

Kareena Kapoor Khan News: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने येत्या वर्षामध्ये स्वतःला कोणत्याही वादापासून अलिप्त ठेवण्याचा निर्धार केला आहे.
Kareena Kapoor
Kareena Kapoor Instagram @kareenakapoorkhan
Published On

Kareena Kapoor 2024 Resolution

नववर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवसच उरले आहेत. जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण वर्षाच्या सुरूवातीला नवीन संकल्प करतात. अनेकांचा संकल्प हा प्रत्येकासाठी फार वेगळा असतो, अनेक जण काम, आरोग्य यासारख्या गोष्टींचा संकल्प करतात, पण बॉलिवूडच्या बेबोने हटक्या पद्धतीमध्ये नववर्षाचा संकल्प केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने येत्या वर्षामध्ये स्वतःला कोणत्याही वादापासून अलिप्त ठेवण्याचा निर्धार केला आहे. या संकल्पांच्या आधारे, आपण सर्व पुढच्या वर्षभरात आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचंय याचा प्रण करत असतो.

Kareena Kapoor
Ujwala Jog Jamal Kudu Dance: मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर भन्नाट डान्स; नऊवारीत थिरकताना पाहून चाहतेही थक्क

अभिनेत्रीने हा नववर्षाचा संकल्प इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. “मी माझ्या आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आहे, जिथे मी स्वतःला वादांपासून दूर ठेवणार आहे. तुम्ही मला १+१=५ असं जरीही सांगितलं तरी तुम्हीच बरोबर आहात, आनंद घ्या...” असा संकल्प अभिनेत्रीने २०२४ या वर्षानिमित्त केला आहे. सध्या खान कुटुंबीय परदेशामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.

स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टावर शेअर केले आहेत. सोबतच करीना ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी लंडनलाही गेली होती. त्यावेळी करीनाने टॉटेनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये फुटबॉल सामनाही पाहिला. पती सैफ आणि मुलगा तैमूरचा या मैदानातील एक फोटोही तिने शेअर केला आहे.

Kareena Kapoor 2024 Resolution Post
Kareena Kapoor 2024 Resolution PostInstagram @kareenakapoorkhan

करीना कपूर आणि सैफ अली खानने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये पहिला मुलगा तैमूर अली खानचा तर २०२१ मध्ये दुसरा मुलगा जेह अली खानचा जन्म झाला. करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री करीना कपूर खान रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जाने’ या चित्रपटामध्ये करीनाने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये करीनासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्माने काम केले होते. लवकरच करीना कपूर 'द क्रू' चित्रपटामध्ये, क्रिती सेनॉन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत दिसणार आहे.

त्यासोबतच बॉलिवूडची बेबो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन भूमिका करणार आहे. तिच्यासोबत अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि इतर कलाकारही दिसणार आहेत.

Kareena Kapoor
Bigg Boss 17: यंदाच्या विकेंडला कोणाचा होणार पत्ता कट?; सोशल मीडियावर होतेय 'या' स्पर्धकाची चर्चा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com