Ranveer Singh: तूच असं करू शकतो..., रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स जाहिरातीमुळे चर्चेत

Ranveer Singh And Johnny Sins: रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स या दोघांच्या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या जाहिरातीमुळे एकच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी रणवीर सिंगचे कौुक केले आहे.
Ranveer Singh And Johnny Sins
Ranveer Singh And Johnny SinsSaam Tv

Ranveer Singh Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की संपूर्ण इंडस्ट्रीत त्याच्यासारखा स्पष्टवक्ता कोणीही नाही. रणवीर सिंगने जॉनी सिन्ससोबत सेक्शुअल वेलनेस ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. या जाहिरातीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. दोघांनी यापूर्वी एक जाहिरात केली होती. ज्याचा प्रोमा रिलीज झाल्यानंतर ते चर्चेत आले होते. आता या दोघांच्या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या जाहिरातीमुळे एकच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी रणवीर सिंगचे कौुक केले आहे.

रणवीर सिंगने जॉनी सिन्सच्या सहकार्याने पुरुषांच्या सेक्शुअल वेलनेस ब्रँडसाठी पुन्हा एक जाहिरात घेऊन आला आहे. यावेळी रणवीर सिंगची जाहिरात टीव्ही सीरियलसारखी नसून टीव्हीसीच्या जाहिरातीसारखी दिसत आहे. तर रणवीर सिंग सेल्समनच्या भूमिकेत आहे आणि जॉनी सिन्स ग्राहक आणि डॉक्टरची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सच्या नव्या जाहिरातीवर नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

रणवीर सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही नवीन जाहिरात शेअर केली आहे. नवीन जाहिरातीमध्ये या ब्रँडची जाहिरात अतिशय मनोरंजक पद्धतीने करण्यात आली आहे. ज्यावर नेटकरी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, 'व्वा, काय मार्केटिंग कॅम्पेन आहे.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'रणवीर काहीही करू शकतो.' तर तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे खूप महत्वाचे आहे. याची लोकांना लाज वाटावी असे नाही तर त्यांनी अधिक बोलले पाहिजे. अतिशय सुंदर जाहिरात.'

Ranveer Singh And Johnny Sins
Celebrities Divorced: पत्नीवर क्रूरतेचा आरोप करत 'या' सेलिब्रिटींनी दिलाय घटस्फोट; यादीत पहिल्या क्रमांकावर बॉलिवूडचा सुपरस्टार

रणवीर सिंगचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, 'रणवीर सिंग तू कधीही प्रभावित करण्यात कमी पडत नाहीस. तू खूप माहितीपूर्ण आणि मजेदार आहेस. असे काहीतरी फक्त तूच करू शकता.' दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स हे एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. रणवीर आणि जॉनी हे एका थीमवर आधारित टीव्ही सीरियलमध्ये दिसले होते. ही जाहिरात समोर आल्यानंतर काही टीव्ही कलाकारांनी रणवीर सिंगवर टीका केली होती. पण प्रियांका चोप्रा, विक्रांत मैस्सीसह अनेक कलाकारांनी रणवीर सिंगच्या या धाडसी कृत्याचे कौतुक केले होते.

Ranveer Singh And Johnny Sins
Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'मधील दुसरं 'मर्दमावळा' गाणं रिलीज, २६ एप्रिलला चित्रपट येतोय भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com