Celebrities Divorced: पत्नीवर क्रूरतेचा आरोप करत 'या' सेलिब्रिटींनी दिलाय घटस्फोट; यादीत पहिल्या क्रमांकावर बॉलिवूडचा सुपरस्टार

Kunal Kapoor To Johhny Depp: बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटीचे लग्न मोडले आहेत. या सेलिब्रिटींनी क्रूरतेच्या आधारावर आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. नुकताच सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.
Celebrities Divorced
Celebrities DivorcedSaam TV
Published On

Celebrities Divorced Update:

बॉलिवूडसह (Bollywood) इतर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे नेहमीच आपल्या अफेअर आणि लग्नामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटीचे लग्न मोडले आहेत. या सेलिब्रिटींनी क्रूरतेच्या आधारावर आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. नुकताच सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. क्रुरतेचा आरोप करत त्याने घटस्फोटाची मागणी केली होती. कोर्टाने देखील घटस्फोटाला मंजुरी दिली. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरपासून ते हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पत्नीला अशाप्राकरे घटस्फोट दिला आहे. या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये कोण-कोण येतं ते आज आपण पाहणार आहोत...

सैफ अली खान -

बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा देखील घटस्फोट झाला. 13 वर्षांच्या सुखी संसारानंतर २००४ मध्ये हे कपल वेगळे झाले. २००५ मध्ये सैफने एका मुलाखतीत त्याच्या अडचणीत आलेल्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला होता. सैफने द टेलिग्राफला सांगितले होते की, त्याच्या पत्नीकडून त्याच्यावर घरगुती अत्याचार झाले आणि त्यामुळे त्याच्यावर भावनिक परिणाम झाला. त्याची पात्रता नसल्याबद्दल त्याला वारंवार आठवण करून दिली गेली आणि त्याला टोमणे मारले गेले. सतत अपराधीपणाची वागणूक दिली गेली. त्यामुळे या नात्यापासून मी दूर गेलो आणि घटस्फोट घेतला, असल्याचे सैफने सांगितले.

कुणाल कपूर -

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरने पत्नी एकता कपूरवर क्रुरतेचा आरोप करत घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. दिल्ली हाय कोर्टाने कुणाल कपूरला एकतापासून घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली आहे. कुणाल कपूरने एकतावर वागणुकीत आदर नाही आणि सहानुभूतीचा आभाव असल्याचा आरोप केला होता. कुणाल कपूरने एकतासोबत २००८ मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे.

शिखर धवन -

टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवनने देखील क्रुरतेचे कारण देत घटस्फोट घेतला होता. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी हे घटस्फोटामुळे चर्चेत होते. १० वर्षांच्या सुखी संसारानंतर २०२३ मध्ये हे दोघे वेगळे झाले. मानसिक क्रुरतेच्या आधारावर दिल्ली हायकोर्टाने शिखर धवन आणि आयशा मुखर्जीला घटस्फोट मंजूर केला. शिखर धवनने त्याच्या पत्नीने केलेल्या मानसिक क्रूरतेचा दाखला दिला. कारण तिने ऑस्ट्रेलियात राहून त्याला त्यांचा मुलापासून अनेक वर्षे दूर ठेवले आणि त्याला 'लाँग डिस्टन्स मॅरेज'मध्ये राहण्यास भाग पाडले.

जॉनी डेप -

हॉलिवूड अभिनेते जॉनी डेप आणि अंबर हर्ड या सेलिब्रिटी कपलचे नाते देखील फारकाळ टिकले नाही. 2009 मध्ये 'द रम डायरी'च्या सेटवर या कपलची भेट झाली होती. काही वर्षांनंतर त्यांनी डेटिंग सुरू केली आणि २०१५ मध्ये लग्न केले. २०१६ मध्ये ॲम्बर हर्डने जॉनी डेपवर शारीरिक शोषणाचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. डेपने हे आरोप फेटाळले होते. डेपने देखील अंबर हर्डवर शारीरिक हिंसाचाराचा आरोप केला. २०१७ मध्ये त्यांना घटस्फोट मंजूर झाला.

Celebrities Divorced
Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'मधील दुसरं 'मर्दमावळा' गाणं रिलीज, २६ एप्रिलला चित्रपट येतोय भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com