डोळे दिपवून टाकणारे सेट्स, राजा महाराजांच्या काळातील चित्रपटाची कथा, चित्रपटातील गाण्यांमध्ये वेगळेपणा आणि दमदार कथा. अशी ओळख असणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस.
संजय लीला भन्साळी यांची ओळख म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांची ओळख आहे. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'ब्लॅक', 'गुजारिश', 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'गंगूबाई काठियावाडी' सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. (Bollywood)
संजय लीला भन्साळी आज २४ फेब्रुवारी रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. संजय भन्साळी यांचे वडील नवीन भन्साळी हे देखील एक बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. वडील जरीही निर्माते असले तरीही संजय यांच्या घरातील परिस्थिती खूपच हालाखीची होती. संजय यांच्यासह त्यांच्या परिवाराने फार गरीबीत दिवस काढले होते. संजय यांची आई कपडे शिवून परिवाराचा उदरनिर्वाह करायची. (Bollywood News)
२०१९ मध्ये फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत भन्साळींनी आपल्या बालपणाबद्दल भाष्य केले होते, “आम्ही चाळीमध्ये राहायचो. आमच्या घरातल्या भिंतींना साधा रंगही नव्हता. माझी आई खूप चांगली नृत्यांगना होती. ती अनेक छोटछोट्या कार्यक्रमांमध्ये डान्स करायची. त्यातूनच आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हायचा. आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नव्हते. अशा अनेक गोष्टी होत्या ज्यापासून मी वंचित होतो. मला छोट्या घरामध्ये खूप भिती वाटायची. कारण मला क्लॉस्टेरोफोबिया म्हणजे (बंद खोलीमध्ये घाबरल्या सारखे जाणवते) पण शेवटी कौटुंबिक परिस्थितीमुळे आम्ही तसे दिवस काढले.” (Bollywood Film)
संजय लीला भन्साळी यांना लहानपणापासूनच दिग्दर्शनाची आवड होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या 'जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकावर आधारित 'भारत की खोज' या सीरीजचे दिग्दर्शन केले होते. संजय टीव्हीनंतर चित्रपटांकडे वळले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. 'परिंदा' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन केले होते.
संजय लीला भन्साळी लवकरच 'हीरामंडी'च्या माध्यमातून पाकिस्तानच्या रेड लाईट एरियाचे वास्तव जगासमोर आणणार आहेत. या वेब सिरीजमध्ये एका वेश्येची कथा दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांसारख्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भन्साळी 'हिरामंडी'मधून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.