The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी येणार भेटीला

The Sabarmati Report Release Date: या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अशामध्ये या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
The Sabarmati Report Movie
The Sabarmati Report MovieSaam Tv

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटामुळे विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अशामध्ये या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राशी खन्नाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, '२ ऑगस्ट रोजी 'द साबरमती रिपोर्ट'च्या फाइल्स पुन्हा उघडणार.' विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' आता नव्या तारखेला रिलीज होणार आहे. याआधी ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी रिलीज डेट बदलली असून हा चित्रपट आता २ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राशी खन्ना आणि विक्रांत मेस्सी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रंजन चंदेल दिग्दर्शित, 'द साबरमती रिपोर्ट' हा एक विचार करायला लावणारा सिनेमॅटिक अनुभव असणार आहे.

The Sabarmati Report Movie
Pankaj Tripathi च्या मेहुण्याच्या कारला असा झाला अपघात, घटनेचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात राज्यामध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

The Sabarmati Report Movie
Nilesh Sable New Show: निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com