बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाहेर १४ एप्रिलला पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई आणि कच्छ पोलिसांनी गुजरातच्या भूजमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर, सलमानच्या घराबाहेर आणि त्याच्या खासगी सुरक्षेतत पोलिसांनी वाढ केलेली आहे. अशातच सर्वांकडून खान कुटुंबीयांना आणि सलमानला (Salman Khan) दुसरीकडे राहायला जाण्याचा सल्लाही दिला जात आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबाराची घटना घडल्यापासून, सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून पनवेलच्या फार्महाऊसवर जाण्याचा विचार करीत आहे, असे वृत्त टाईम्स नाऊने दिलेले होते. त्याचे हे पनवेलमधील फार्महाऊस ‘बिग बॉस’च्या शूटिंगच्या सेट लोकेशनच्या जवळच आहे. या फार्म हाऊसवर सलमान खान याआधी अनेक वेळा राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळतही अभिनेता पनवेलमधल्या फार्महाऊसवरच राहत होता. (Bollywood News)
पण, पनवेलच्या फार्महाऊसवर स्वत: सलमान खानच जाणार आहे की, त्याचे कुटुंबीयही जाणार आहेत. अद्याप हे अस्पष्ट आहे. खरंतर जिथे सलमान राहतो, तिथं अनेक बड्या सेलिब्रिटींचीही घरे आहेत. तसेच काही हाय प्रोफाईल लोकांचीही तिकडे घरे आहेत. सलमानमुळे इतरांनाही त्रास नको, यासाठी कदाचित हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यासोतच सलमान तिथल्या फार्महाऊसवर कायमचा शिफ्ट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर राज्यातील बडे राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या घरी भेटण्यासाठी उपस्थिती लावली होती.
दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी १४ एप्रिलला पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. भूजमधून विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला मुंबई पोलिस आणि कच्छ पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे १६ एप्रिलला अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. आरोपींनी गोळीबार वॉर्निंग म्हणून नाहीतर त्याची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.