Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल करत तपास सुरू

Ranveer Singh Deepfake Video Case: अभिनेता आमिर खानप्रमाणेच रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ (Ranveer Singh Deepfake Video) व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसला.
Ranveer Singh Deepfake Video Case
Ranveer Singh Saam Tv

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) डीपफेक व्हिडीओचा (Deepfake Video) बळी ठरलाय. याप्रकरणी रणवीर सिंगने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर क्राइम सेलकडे तक्रार केली होती. रणवीर सिंगच्या तक्रारीची दखल घेत आता महाराष्ट्र सायबरने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता आमिर खानप्रमाणेच रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ (Ranveer Singh Deepfake Video) व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसला.

रणवीर सिंगच्या व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडीओमध्ये तो पीएम मोदींविरोधात भाष्य करता दिसला. या व्हिडीओमध्ये त्याने काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले होते. हा डीपफेक व्हिडीओ समोर येताच रणवीर सिंगने थेट मुंबई पोलिसात धाव घेत याप्रकरणी सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली होती.

Ranveer Singh Deepfake Video Case
Salman Khan's Galaxy Apartment: गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याच्या तयारीत; 'या' ठिकाणी होणार शिफ्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सुजाता इंडिया फर्स्ट अकाऊंटच्या युजरविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंगच्या वडिलांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Ranveer Singh Deepfake Video Case
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; तापी नदीतून पिस्तुल आणि काडतुसं काढली बाहेर

फसवणूक, बनावटीकरण तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सुजाता इंडिया फर्स्ट अकाऊंटच्या युजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र सायबरने याप्रकरणाता तपास सुरू केला आहे. एआयच्या मदतीने रणवीर सिंगचा हा डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. दरम्यान, या आधी रणवीर सिंगप्रमाणे रश्मिका मंदान्ना, अक्षय कुमार, काजोल, आमिर खान आणि आलिया भट हे सेलिब्रिटी डीपफेकचा शिकार झाले आहेत.

Ranveer Singh Deepfake Video Case
OTT Released This Week: 'या' आठवड्यात पाहायला मिळणार ॲक्शन, ड्रामा अन् थ्रिलर असणाऱ्या कलाकृती, जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com