Panchayat 3 : 'पंचायत ३' केव्हा रिलीज होणार? प्राईम व्हिडीओने शेअर केलेला नवीन व्हिडीओ एकदा बघाच

Panchayat 3 News : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत' (Panchayat) वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनसाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. सध्या चाहत्यांना या वेबसीरीजच्या रिलीज डेटबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे.
Panchayat 3 Released Date
Panchayat 3 Released DateSaam Tv

Panchayat 3 Released Date

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत' (Panchayat) वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनसाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वेबसीरीजला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही वेबसीरीज कायमच ओटीटीवर टॉपवर कायम राहिलेली आहे. अशातच 'पंचायत ३'च्या रिलीजबद्दल एक अपडेट समोर आली आहे. नुकतंच "ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ"न इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओज् शेअर करण्यात आलेले आहे. (Bollywood)

Panchayat 3 Released Date
Samay Shah Interview : 'ते डिप्रेशनमध्ये नव्हते, त्यांना...'; गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर ऑनस्क्रिन मुलाचा मोठा खुलासा

त्यातील शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये, एक फ्रिज दिसत आहे. त्यावर "उघडू नका, आतमध्ये 'पंचायत ३'ची रिलीज डेट आहे." रिलीज डेट कळावी म्हणून, कोणीतरी फ्रीजचं दरवाजा उघडला आहे. पण फ्रीजमध्ये रिलीज डेट नाही, पण दुधी होती. संपूर्ण फ्रीजमध्ये दुधी भरलेला दिसत आहे. सध्या चाहत्यांना 'पंचायत ३'च्या रिलीज डेटबद्दल फारच उत्सुकता आहे. (Web Series)

तर पुढच्या व्हिडीओमध्ये लवकरच 'पंचायत ३'ची रिलीज डेट जाहीर होईल असे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मालिकेची शुटिंग संपली आहे. वेबसीरीजच्या एडिटिंगचं काम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिसऱ्या सिझनची प्रेक्षक वाट पाहत आहे. ‘पंचायत ३’ केव्हा रिलीज होणार अद्याप अस्पष्ट आहे. फॅमिली आणि कॉमेडी ड्रामा असणाऱ्या या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीता गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठव, पंकज झा, सुनीता राजवर हे कलाकार आहेत. (Entertainment News)

Panchayat 3 Released Date
Shivali Parab New Home : ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने खरेदी केलं नवं घर, वाढदिवशीच करणार गृहप्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com