Shivali Parab New Home : ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने खरेदी केलं नवं घर, वाढदिवशीच करणार गृहप्रवेश

Shivali Parab News : ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने एका मुलाखतीमध्ये चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने नवे खर खरेदी केल्याचे वृत्त चाहत्यांना दिले आहे.
Shivali Parab Bought New Home
Shivali Parab Bought New HomeSaam Tv

Shivali Parab Bought New Home

हास्यजत्रा फेम शिवाली परब हिला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच शिवालीच्या अभिनयाची आणि तिच्या कॉमेडीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. अशातच अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने नवं घर घेतल्याचं सांगितलं आहे. लवकरच त्या घराची ती पूजाही करणार असल्याचं तिने सांगितले आहे.

Shivali Parab Bought New Home
Juna Furniture Collection : महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर कमाल, पहिल्या विकेंडला कमावले कोट्यवधी रुपये

‘मीडिया टॉल्क मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवालीने सांगितले आहे. १० मे ला शिवाली परबचा वाढदिवस असतो. २०२४चा वाढदिवस अभिनेत्रीसाठी खास आहे. तिच्या वाढदिवशी तिच्या नव्या घराची पूजा असल्याचं तिने सांगितले. अभिनेत्री मुलाखत म्हणाली, "यंदाच्या वाढदिवशी काही स्पेशल नाही. पण मी आता सांगते, मी काही दिवसांपूर्वी मी नवं घर खरेदी केलं आहे. त्या घराची पूजा मी माझ्या वाढदिवशी करणार आहे. हे सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असेल." (Maharashtrachi Hasyajatra)

अभिनेत्री नवं घर खरेदी करणार म्हटल्यावर शिवालीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्यावर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ हे वर्ष अनेक मराठी सेलिब्रिटींसाठी खास ठरलेलं आहे. अनेकांनी नवीन घर आणि कार खरेदी केलेली आहे. त्या यादीमध्ये आता शिवाली परबचेही नाव सामील झाले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये तिने काम केले होते. 'चंद्रमुखी' चित्रपटामधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यासोबतच तिचे काही साँग्जही रिलीज झाले. (Entertainment News)

Shivali Parab Bought New Home
Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com